PMC Sky Sign Department | अनधिकृत होर्डिंग तपासणी साठी  पाच पथकांची नियुक्ती | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Homeadministrative

PMC Sky Sign Department | अनधिकृत होर्डिंग तपासणी साठी  पाच पथकांची नियुक्ती | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Ganesh Kumar Mule Feb 11, 2026 7:48 PM

PMC Property Tax Department | वसुलीसाठी प्रॉपर्टी टैक्स विभागाकडे अतिरिक्त ५५ कर्मचारी!
Unauthorized hoardings removed in Kothrud, Warje, Wanwadi areas | Action of PMC Sky Sign Department
Pune Property tax | सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूटवर मिळकतकर विभागाची जप्तीची कारवाई | ४७ कोटींची थकबाकी

PMC Sky Sign Department | अनधिकृत होर्डिंग तपासणी साठी  पाच पथकांची नियुक्ती | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

 

Madhav Jagtap PMC – (The Karbhari News Service) – पुणे शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंग तपासणी करता पाच पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, या पथकांमार्फत अनाधिकृत होर्डिंग ची तपासणी केली जाणार आहे, यामध्ये यामध्ये जागेवर परवानगीचा बोर्ड न लावणे दिलेल्या आकारमानापेक्षा जास्त मापाचा बोर्ड लावणे नियमांचे उल्लंघन करणे त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग आढळून आल्यानंतर सदर होर्डिंग वर कारवाई करून ते निष्कर्षित करण्यात येणार आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. (Pune Illegal Hoardings)

जगताप यांनी सांगितले कि, कारवाई केल्यानंतर  त्या होर्डिंगची गुगल इमेज वरून ते होल्डिंग कोणत्या सालापासून अस्तित्वात आहे, त्याप्रमाणे त्यांचे कडून दंडासह परवाना शुल्क वसूल केले जाणार आहे, त्याचबरोबर निष्कषणासाठी येणारा दोन लाख रुपये इतका खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे,

आज हडपसर भागामध्ये पदकामार्फत 30 होर्डिंगची तपासणी केली असून पथकास ७ अनधिकृत होर्डिंग आढळून आलेले आहेत. त्यानुसार आज एकूण ४ होर्डिंग वर निश्काषण ची  कारवाई करण्यात आलेली आहे. असे जगताप यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: