Santosh Bakery – Apte Road Pune | सिंहगड रोडवरील घटनेचा आमच्याशी काही संबंध नाही | संतोष बेकरी- आपटे रोडच्या मालकाकडून स्पष्टीकरण

HomeBreaking News

Santosh Bakery – Apte Road Pune | सिंहगड रोडवरील घटनेचा आमच्याशी काही संबंध नाही | संतोष बेकरी- आपटे रोडच्या मालकाकडून स्पष्टीकरण

Ganesh Kumar Mule Feb 11, 2026 6:27 PM

IAS Naval Kishore Ram Vs MNS | फक्त गोंधळ घालणे हाच मनसे कार्यकर्त्यांचा हेतू होता  | महापलिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केली भूमिका
VVPAT Machine | व्हीव्हीपॅटमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठी बाबत सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या संदेशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
Nirbhay Bano sabha Pune | निर्भय बनो सभेवरून पुणे कॉंग्रेस चे पुणे भाजपला आव्हान! 

Santosh Bakery – Apte Road Pune | सिंहगड रोडवरील घटनेचा आमच्याशी काही संबंध नाही | संतोष बेकरी- आपटे रोडच्या मालकाकडून स्पष्टीकरण

 

Santosh Bakery Patis – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील सिंहगड रोडवरील संतोष बेकरी (Santosh Bakery Sinhgad Road) मधील पॅटिस बाबत स्वच्छता आणि तिथल्या दर्जाबाबत एक घटना घडली आहे. यामुळे संतोष बेकरीला रोषाचा सामना करावा लागत आहे. मात्र यामुळे कुठलाही संभ्रम किंवा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून आपटे रोडवरील संतोष बेकरीचे (Santosh Bakery Apte Road) मालक पुढे आले आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, आमचा सिंहगड रोडवरील बेकरीशी काही संबंध नाही. आम्ही आमच्या स्वच्छता आणि दर्जाबाबत कटिबद्ध आहोत. (Pune News)

पुणे शहरात संतोष बेकरीचे पॅटिस खूप प्रसिद्ध आहेत. आपटे रोडवरील संतोष बेकरीत नागरिक पॅटिस घेण्यासाठी गर्दी करतात. गेल्या कित्येक वर्षापासून हाच शिरस्ता सुरू आहे. दरम्यान संतोष बेकरीतील पॅटीस बाबत नुकतीच एक घटना घडली आहे. एका ग्राहकाला त्या पॅटिस मध्ये मुंग्या आढळून आल्या. त्यामुळे बेकरी बाबत नागरिकात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या बाबत काही प्रसार माध्यमात बातम्या आल्या आहेत. तसेच सोशल मीडिया वर देखील या घटनेची चर्चा होत आहे. मात्र ही घटना सिंहगड रोडवरील संतोष बेकरी शी संबंधित आहे. आपटे रोड चा यात काही संबंध नाही, हे आता समोर आले आहे.

याबाबत आपटे रोडवरील संतोष बेकरीचे मालक मयूर शेळके यांनी सांगितले कि, सिंहगड रोडवरील संतोष बेकरीशी आमचा संबंध नाही. फक्त नावात साधर्म्य आहे. आमचा व्यवसाय स्वतंत्र आहे. आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या स्वच्छता आणि दर्जाबाबत कटिबद्ध आहोत.
—-

प्रिय ग्राहकहो, सोशल मीडियावर सुरू असलेल्या बातमीबाबत संतोष बेकरी- आपटे रोड शी काही संबंध नाही. ही बातमी Santosh Bekary – सिंहगड रोड (Santosh Food Products) शी संबंधित आहे. नाव एक असले तरी आमचे व्यवसाय स्वतंत्र आहेत. आम्ही आमच्या स्वच्छता आणि दर्जाशी कटिबद्ध आहोत.

मयूर विजय शेळके, मालक, संतोष बेकरी- आपटे रोड.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: