Pune Property Tax | वसूली मोहिमेसाठी प्रॉपर्टी टॅक्स विभागाला अतिरिक्त 112 कर्मचारी | 31 मार्च पर्यंत हे कर्मचारी करणार काम! 

Homeadministrative

Pune Property Tax | वसूली मोहिमेसाठी प्रॉपर्टी टॅक्स विभागाला अतिरिक्त 112 कर्मचारी | 31 मार्च पर्यंत हे कर्मचारी करणार काम! 

Ganesh Kumar Mule Feb 11, 2026 1:38 PM

Madhuri Misal on PMC Projects | शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवा | राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश 
Bill checking work | वेतन लवकर करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही बिल तपासणीचे काम सुरु  | मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे आदेश 
PMC Employees on Indore Tour |  पुणे महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी अभ्यास दौऱ्यासाठी निघाले इंदौरला!

Pune Property Tax | वसूली मोहिमेसाठी प्रॉपर्टी टॅक्स विभागाला अतिरिक्त 112 कर्मचारी | 31 मार्च पर्यंत हे कर्मचारी करणार काम!

 

PMC Employees – (The Karbhari News Service) – कर आकारणी आणि कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी देण्यात आले आहेत. विविध विभागातील सुमारे ११२ कर्मचारी वसुली करण्यासाठी नेमण्यात आले आहेत. ३१ मार्च पर्यंत हे कर्मचारी टैक्स विभागाकडे कामासाठी असतील. याबाबत आदेश अतिरिक्त पवनीत कौर यांनी जारी केले आहेत. (PMC Property Tax Department)

कर संकलन विभागाने आजपर्यंत अडीच हजार कोटींचा महसूल गोळा केला आहे. अभय योजनेचा देखील हैट सहभाग आहे. दरम्यान अभय योजना १५ तारखेला संपत करण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत जास्तीत जास्त उत्पन्न वाढविण्याची धडपड विभागाची सुरू आहे. त्यासाठी विभागाने अतिरिक्त कर्मचारी यांची मागणी केली होती. त्यानुसार ११२ कर्मचारी देण्यात आले आहेत. (Pune PMC News)

अतिरिक्त आयुक्त यांनी आदेश जारी केल्यानंतर काही कर्मचारी विभागाकडे रुजू झाले आहेत. अजून बरेच कर्मचारी येणे बाकी आहे. हे कर्मचारी विभागीय निरीक्षक यांच्या हाताखाली वसुलीचे काम करणार आहेत. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

अभय योजनेला उरले अवघे चार दिवस
दरम्यान विभागाने अभय योजनेला मुदतवाढ देत १५ फेब्रुवारी पर्यंत सवलतीत कर भरण्याची मुभा दिली होतो. सवलतीत टैक्स भरण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: