Pune Mayor Election | आजच कळणार पुण्याचा महापौर आणि उपमहापौर! | सकाळी ११ वाजता अर्ज दाखल केले जाणार

Homeadministrative

Pune Mayor Election | आजच कळणार पुण्याचा महापौर आणि उपमहापौर! | सकाळी ११ वाजता अर्ज दाखल केले जाणार

Ganesh Kumar Mule Feb 03, 2026 8:41 AM

Pune Property tax | अभय योजना राबवण्यापेक्षा १ कोटीहून जास्त थकबाकी असलेल्या १६६७ थकबाकीदारा कडून ७७३७ कोटीची थकबाकी वसूल करा!
Navale Bridge Accident | अल्पकालीन उपाययोजना तातडीने अमलात आणा – मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश | यंत्रणांवर जबाबदारी निश्चित
Pune PMC Helmet News | कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांना देखील हेल्मेट सक्तीचे केल्याने पुणे महापालिकेत उद्भवले वादाचे प्रसंग!

Pune Mayor Election | आजच कळणार पुण्याचा महापौर आणि उपमहापौर! | सकाळी ११ वाजता अर्ज दाखल केले जाणार

 

Pune Dy Mayor Election – (The Karbhari News Service) – पुण्याचा महापौर आणि उपमहापौर हे ६ फेब्रुवारीला ठरणार होते. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. या दोन्ही पदाची निवडणूक ही ९ फेब्रुवारीला होणार आहे. यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित असणार आहेत. दरम्यान यासाठी नामनिर्देशन ३ फेब्रुवारीला म्हणजे आज दाखल केले जाणार आहे. त्यामुळे आजच लक्षात येणार आहे की पुण्याचा नवीन महापौर आणि उपमहापौर कोण आहे ते. भाजप या पदांसाठी कुणाला संधी देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Pune PMC News)

पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकीनंतरची पहिली सभा (विशेष बैठक) सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० (अकरा) वाजता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात (पुणे महानगरपालिकेच्या नविन विस्तारीत इमारतीतील सभागृहात) विभागीय आयुक्तयांचे आदेशानुसार जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १९(१) अन्वये महापौर व उपमहापौर या पदांची निवडणूक या सभेत होईल.

महाराष्ट्र महानगरपालिका ( महापौर पदाचे आरक्षण) नियम २००६ अन्वये पुणे महानगरपालिकेचे महापौर पद – महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे.

दरम्यान आज सकाळी दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. भाजपकडून अर्ज दाखल केल्यानंतर लक्षात येईल की महापौर आणि उपमहापौर कोण असेल ते. तसेच विरोधी पक्षाकडून देखील उमेदवार दिले जातील. दरम्यान भाजपकडून महापौर पदासाठी मानसी देशपांडे यांना संधी दिली जाईल. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: