PMC Social Devlopment Department | १० वी १२ वी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ | महापालिका प्रशासनाचा निर्णय
PMC Social Development Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. १ ऑगस्ट पासून ते ३१ डिसेंबर या कालावधी पर्यंत यासाठी कालावधी देण्यात अल होता. मात्र मधील काळात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे आता यास मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आता १० फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ असणार आहे. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागा यांच्या वतीने देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वीउत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. एकाइ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसाहाय्य देण्याची ही योजना आहे.
खुल्या गटातील विद्यार्थ्यांना २०२४ (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १० वी / इ. १२ वी मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे आवश्यक आहे. तथापि पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी/ रात्रशाळेतील विद्यार्थी/ मागासवर्गीय विद्यार्थी यांनी किमान ७०% गुण आवश्यक आहेत आणि ४०% दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना / कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित, कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान ६५% गुण मिळणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्थसाहाय्य हे इ. १० / १२ वी नंतर शासनमान्य / विद्यापीठमान्य संस्थेत प्रवेश घेतला असल्यासच मिळेल.
ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज dbt.pmc.gov.in या वेबसाईट वर हे अर्ज भरता येतील. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
| आता पर्यंत ९ हजार ३५८ अर्ज
दरम्यान या दोन्ही योजनासाठी आता पर्यंत एकूण ९ हजार ३५८ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. त्यातील ७ हजार ८६ हे १० वी च्या योजनेसाठी तर २ हजार २७२ हे १२ वी च्या योजनेसाठी आले आहेत.
| विविध कल्याणकारी योजनांना देखील मुदतवाढ
१० वी १२ वी शिष्यवृत्ती योजने सहित विविध कल्याणकारी योजनाना देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये दिव्यांग कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना, महिला बाल कल्याण योजना आणि मागासवर्गीय कल्याणकारी योजना यांचा समावेश आहे.

COMMENTS