PMC Election Voting | मतदान केंद्र असलेल्या इमारतींमध्ये १४ आणि १५ जानेवारी ला सुट्टी जाहीर!

Homeadministrative

PMC Election Voting | मतदान केंद्र असलेल्या इमारतींमध्ये १४ आणि १५ जानेवारी ला सुट्टी जाहीर!

Ganesh Kumar Mule Jan 12, 2026 8:55 PM

MLA Sunil Tingre | Porwal road | अखेर पोरवाल रस्त्यांच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश
Blood Donation Camp | दाभोलकरांच्या बलिदान दिनानिमित्त ६२ जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचा उपक्रम
Pune Book Festival | ‘शांतता….पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांचा उपक्रमात सहभाग

PMC Election Voting | मतदान केंद्र असलेल्या इमारतींमध्ये १४ आणि १५ जानेवारी ला सुट्टी जाहीर!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) -पुणे महापालिका निवडणुकीसाठी  ज्या इमारतींमध्ये मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे, त्या इमारतींमध्ये १४ जानेवारी  (मतदान पूर्वतयारीचा दिवस) व  १५ जानेवारी  (मतदानाचा दिवस) या कालावधीत निवडणूक विषयक कामकाजाव्यतिरिक्त इतर सर्व नियमित कामकाज बंद ठेवण्यात येईल.या  आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध प्रचलित कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. असा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram IAS) यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदानाचा दिनांक १५ जानेवारी २०२६ असा निश्चित केला आहे. या पार्श्वभूमीवर प्राप्त अधिकारांचा वापर करून मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या इमारतींमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी तसेच मतदान यंत्रांची वाहतूक, मतदान कक्षांची मांडणी, कायदा व सुव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था आदी पूर्वतयारी व मतदानाच्या दिवशी आवश्यक असलेल्या कामकाजासाठी पुणे महानगरपालिका हद्दीतील विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय/निमशासकीय कार्यालये, संस्था, सभागृहे, मंगल कार्यालये व इतर इमारती मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: