Bodybuilding Competetion |  पुणे जिल्हास्तरीय पुणे श्री 2025 या स्पर्धेमध्ये प्रथमच खेळाडूंसाठी पाच गदांचा सन्मान

HomeBreaking News

Bodybuilding Competetion |  पुणे जिल्हास्तरीय पुणे श्री 2025 या स्पर्धेमध्ये प्रथमच खेळाडूंसाठी पाच गदांचा सन्मान

Ganesh Kumar Mule Dec 23, 2025 1:36 PM

Farmers affected by heavy rains | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार | योजनेतील जाचक अटी काढणार
PMC Pune Property Tax 40% Discount PT 3 Application Form | ४०% सवलतीचा पीटी ३ अर्ज महापालिका वेबसाईट वर उपलब्ध 
SARATHI | सारथी संस्थेमार्फत विविध उपक्रमांचा शुभारंभ

Bodybuilding Competetion |  पुणे जिल्हास्तरीय पुणे श्री 2025 या स्पर्धेमध्ये प्रथमच खेळाडूंसाठी पाच गदांचा सन्मान

 

Pune Shree 2025 – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हास्तरीय मानाची पुणे श्री 2025 या स्पर्धेचे आयोजन समीर भिवा तरस, सनी यशवंत राऊत,अजित मोहन देशमुख यांनी युनिटी फिट क्लबच्या वतीने व बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांच्या संलग्न संघटनांची मिळून केले होते. अशी माहिती अजय लक्ष्मण गोळे, जनरल सेक्रेटरी, बॉडी बिल्डींग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांनी दिली.

या स्पर्धेतील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विजेता व उपविजेता यांना मानाच्या गदा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व रोख रकमेची मोठी बक्षिसे देण्यात आली

विनोद कागडे व महेश कानसकर यांच्या अतिशय अतितटीच्या झालेल्या सामन्यात पुणे श्री 2025 चा मानकरी यु एफ सी जिमचा विनोद काकडे व उपविजेता मयूर कानसकर ठरला.

मेन्स फिजिक्स पुणे श्री मानकरी सिल्वर फिटनेस जिमचा अजित तावरे व उपविजेता संदेश देशमुख ठरला.

महिला गटातून आर बाउन्स फिटनेसची शितल वाडेकर यांनी मिस पुणे वुमन फिटनेस हा किताब जिंकला.

या स्पर्धेतील बेस्ट पोजरचा मानकरी संदीप तिवडे, मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरचा मानकरी ठरला.

पुणे जिल्ह्यातील २८० स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

महिला खेळाडू या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण ठरल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सदस्य ॲड विक्रम रोठे , इंटरनॅशनल बॉडी बिल्डर महेंद्र चव्हाण मा श्री शरद मारणे, जनरल सेक्रेटरी श्री अजय गोळे, मंदार चवरकर, डॉ सचिन वानखेडे, मनीष पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये पंच म्हणून राम बराटे, प्रमोद नाईक, युनुस काझी, संग्राम पवार, विकास पाटील, कौस्तुभ शेडगे, ज्योती भादेकर, विशाल मोहिते, ओंकार शेवकर ,शरद तिवारी, उमेश मोहतकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

वुमन क्लासिक
पहिला क्रमांक शितल वाडेकर,पुणे, दुसरा क्रमांक स्नेहल ठाकूर, तिसरा क्रमांक संज्योत डंकी,चौथा क्रमांक प्रतिमा कांबळे, पाचवा क्रमांक यशोदा भोर, पुणे

मेन्स फिजिक्स पहिला गट

1 अजित तावरे, 2 प्रसाद सुतार, 3 प्रफुल्ल गायकवाड, 4 प्रणय जाधव, 5 सुरज भोसले

मेन्स फिजिक्स दुसरा ग
1 संदेश देशमुख, 2 अमर पडवळ, 3 मयूर पळसकर, 4 स्वप्निल बच्चे, 5 सोमेश सुतार

55 किलो गट
1 निलेश गजमल, 2 आकाश देसाई, 3 सोमनाथ पाल, 4 यशराज मोरे, 5 अभिषेक सनस,

60 किलो गट
1 मोहसीन शेख, 2 संदीप तिवडे, 3 सिद्धेश गडगे, 4 अमोल वायाळ, 5 मनोज मानकर,

65 किलो गट
1 अक्षय वाडीकर, 2 अर्जुन देडे, 3 विनायक कलरीकन्डी, 4 शुभम शिंदे, 5 सचिन वाघ,

70 किलो गट
1 अजय रक्ताटे, 2 शुभम मिसाळ, 3 अमन सय्यद, 4 स्वप्निल सकुंडे, 5 जयेश गणवे

75 किलो गट
1 मयूर कानसकर, 2 अरबाज शेख, 3 शुभम देवळकर, 4 मोहनीश आहीर, 5 चांगदेव सायकर,

80 किलो गट
1 विनोद कागडे, 2 अनिकेत राजगुरू, 3 मिलिंद खरचणे, 4 शुभम गिरी, 5 सिद्धार्थ मुंगसे,

80 किलो वरील गट
1 अक्षय शिंदे, 2 प्रदीप शिरसागर, 3 फिरोज शेख, 4 ओंकार नलावडे, 5 उदय ननावरे

या स्पर्धेचे सूत्रसंचालन किरण जाधव व अतुल राऊतसर यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: