PMC Commissioner Bungalow | आयुक्त बंगल्यातील वस्तू गहाळ झाल्याच नाहीत | सर्व साहित्य जागेवर उपलब्ध | आता बोला!

Homeadministrative

PMC Commissioner Bungalow | आयुक्त बंगल्यातील वस्तू गहाळ झाल्याच नाहीत | सर्व साहित्य जागेवर उपलब्ध | आता बोला!

Ganesh Kumar Mule Dec 18, 2025 6:49 PM

Voters Service Portal | मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करुन घेण्याचे आवाहन
Pune Metro | CM Eknath Shinde | पुणे मेट्रोच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा
Siddheshwar Shinde Transfer | लेखाधिकारी सिध्देश्वर  शिंदे यांची नागपूर विभागात बदली | राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून आदेश जारी 

PMC Commissioner Bungalow | आयुक्त बंगल्यातील वस्तू गहाळ झाल्याच नाहीत | सर्व साहित्य जागेवर उपलब्ध | आता बोला!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – जून २०२५ मध्ये आयुक्त बंगल्यातील अनेक किमती वस्तू गहाळ झाल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. त्यानंतर आयुक्तांनी शहर अभियंत्यांना याची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. अहवालात आयुक्त बंगल्यातील एकही वस्तू गहाळ झाली नसल्याचा निर्वाळा दिला गेला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

याबाबत सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले कि, मी गेले महिनाभर आयुक्तांकडे सोमवारच्या अधिकारात या अहवालाची प्रत मिळण्यासाठी पाठपुरावा करत होतो , अखेर आज तो अहवाल मला आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झाला ज्यामध्ये आयुक्त बंगल्यातील एकही वस्तू गहाळ झाली नसल्याचा निर्वाळा दिला गेला आहे.

| शहर अभियंता यांच्या अहवालात काय म्हटले आहे?

महापालिका आयुक्त निवासस्थान, शिवाजीनगर पुणे येथील मिळकतीमधील साहित्याबाबत तपासणी करून अहवाल सादर करणे बाबत महापालिका आयुक्त यांचे तोंडी आदेश प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने  मुख्य अभियंता, भवनरचना विभाग, मुख्य अभियंता विद्युत विभाग, मुख्य उद्यान अधीक्षक, उप आयुक्त, मध्यवर्ती भांडार विभाग आणि महापालिका सहाय्यक आयुक्त घोलेरोड – शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका यांचे मार्फत सर्व साहित्याचा तपशील मागविण्यात आलेला आहे.

मुख्य अभियंता, भवनरचना विभाग, मुख्य अभियंता विद्युत विभाग, उप आयुक्त, मध्यवर्ती भांडार विभाग आणि सहाय्यक आयुक्त घोलेरोड शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय यांचे मार्फत महापालिका आयुक्त निवासस्थान, शिवाजीनगर पुणे येथील मिळकतीमधील साहित्याबाबत तपासणी करून अहवाल प्राप्त असून सोबत समाविष्ट करण्यात आलेला आहे.

मुख्य अभियंता, भवनरचना विभाग आणि मुख्य अभियंता, विद्युत विभाग यांनी महापालिका आयुक्त निवासस्थान, शिवाजीनगर पुणे येथील मिळकतीमधील साहित्याबाबत प्रत्यक्ष तपासणी करून सर्व साहित्य जागेवर असल्याची खातरजमा केले बाबत अहवाल सादर करण्यात आलेला आहे.

महापलिका आयुक्त, निवासस्थान, शिवाजीनगर येथील मिळकतीमधील सर्व साहित्य जागेवर उपलब्ध असलेबाबत अहवाल अवलोकनार्थ सादर करण्यात येत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: