PMC Election 2026 | पुणे महापालिका निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे २३,५०० अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती
PMC Election News – (The Karbhari News Service) – राज्य निवडणूक आयोगाकडून पुणे महापालिका निवडणूक घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल आहे. पुणे महापालिका संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता एकूण २३ हजार ५०० कर्मचारी आणि अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सुमारे १५०० अधिकारी/कर्मचारी तसेच मतदान प्रक्रीयेकरिता प्रती मतदान केंद्र :- १ केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई (१०% राखीव) असे एकूण सुमारे ४,००० मतदान केंद्रांसाठी सुमारे २२,००० या प्रमाणे २३,५०० अधिकारी / कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. अशी माहिती महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Employees and Officers)
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण लोकसंख्या :- ३४,८१,३५९
अनुसूचित जातीची लोकसंख्या :- ४,६८,६३३
अनुसूचित जमातीची लोकसंख्या :- ४०,६८७
एकूण प्रभाग संख्या :- ४१ (४ सदस्यीय प्रभाग – ४०, ५ सदस्यीय प्रभाग – ०१) एकूण सदस्य संख्या :- १६५ (पैकी महिलांसाठी राखीव-८३)
अनुसूचित जातीसाठी राखीव सदस्यसंख्या २२ (पैकी महिलांसाठी राखीव – ११) अनुसूचित जमातीसाठी राखीव सदस्यसंख्या ०२ (पैकी महिलांसाठी राखीव – ०१ )
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग राखीव सदस्यसंख्या ४४ (पैकी महिलांसाठी राखीव-२२)
प्रारूप मतदार यादी वर प्राप्त हरकतीचा तपशील :-
प्राप्त एकूण हरकतींची संख्या :- ६५, २१३
मान्य हरकतींची संख्या :- ४७,०६३
अमान्य हरकतींची संख्या :- १८,१५०
एकूण बदल झालेले मतदार :- ९२, ४६६
• प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि. १५/१२/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
·
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण मतदार ३५, ५१,८५४
( पुरुष :- १८, ३२, ४४९, स्त्रिया:- १७,१९,०१७, इतर :- ४८८ )
सर्वाधिक मतदाराचा प्रभाग :- प्रभाग क्र. ९ बाणेर-बालेवाडी-पाषाण (मतदार संख्या १,५६,०३८) सर्वात कमी मतदारांचा प्रभाग :- प्रभाग क्र. ३९ अप्पर सुपर इंदिरानगर (मतदार संख्या- ६०,८८४)
• एकूण मतदान केंद्रांची यादी दि. २०/१२/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
• मतदान केंद्रनिहाय मतदार यादी दि. २७/१२/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
· मतदान केंद्रांची संख्या निश्चिती :-
·
आवश्यक मतदान केंद्रांची संख्या ३५,५१,८५४ / ९०० ३,९४६.५० म्हणजेच सुमारे ४००० मतदान केंद्र सर्वाधिक मतदान केंद्रे असणारा प्रभाग :- प्रभाग क्र. ९ बाणेर-बालेवाडी- पाषाण (मतदार केंद्र- १७४)
• सर्वात कमी मतदान केंद्रे असणारा प्रभाग:- प्रभाग क्र. ३९ अप्पर सुपर इंदिरानगर (मतदार केंद्र – ६८)
• RO आणि ARO नियुक्त्या :-
·
१ निवडणूक निर्णय अधिकारी (RO) व ३ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (ARO) याप्रमाणे नवीन प्रभागांचे वाटप १५ क्षेत्रांमध्ये एकूण १५ RO आणि ४५ ARO यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे.
• राज्य निवडणूक आयोगाच्या http//mahasecvoterlist.in/ वेबसाईटवर Search name in voter list या टॅबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधण्याची सुविधा देण्यात आली आहे. सर्व महानगरपालिकांना त्यांचा वेबसाईटवर सदर सुविधेची लिंक उपलब्ध करुन मतदारांच्या सोयीकरीता देता येईल. जेणेकरुन महानगरपालिकेच्या मतदारांना प्रारुप मतदार यादीत आपले नाव योग्य प्रभागात आले आहे. किंवा कसे हे तपासणे सोपे होईल.
• मतदार यादीत मतदारांचे नाव शोधण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेवर ताण येऊ शकतो म्हणून आपण ऑफलाईन पद्धतीने मतदारांची नावे मतदान केंद्रावर शोधण्याची व्यवस्था करण्याबाबत आयोगाकडे परवानगी मागितली आहे.

COMMENTS