PMC Kamla Nehru Hospital | पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात २४ तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची भरती केली जाणार | महापालिकेकडून जाहिरात जारी

Homeadministrative

PMC Kamla Nehru Hospital | पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात २४ तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची भरती केली जाणार | महापालिकेकडून जाहिरात जारी

Ganesh Kumar Mule Dec 06, 2025 8:51 PM

Prashant Jagtap Vs BJP | बिल्डरसाठी भाजपच्या आमदार व नगरसेवकांची नागरिकांना दमदाटी | राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप
Pune Ganeshotsav 2025 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ७ दिवस परवानगी
PWD app | दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

PMC Kamla Nehru Hospital | पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात २४ तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची भरती केली जाणार | महापालिकेकडून जाहिरात जारी

PMC Health Department Recruitment – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ०४ संवर्गातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची भरती करण्यात येणार आहे. हे अधिकारी एकवट मानधना वर घेण्यात येणार आहेत. त्यांचा कालावधी १२ महिने असेल. त्यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून जाहिरात जारी करण्यात आली आहे. अशी माहिती उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळीवंत यांनी दिली. (Pune Municipal Corporation Health Department)

पुणे महानगरपालिका आरोग्य विभागांतर्गत कमला नेहरू रुग्णालय या सर्वसाधारण रुग्णालयामध्ये खालील ०४ संवर्गातील, एकूण २४ पद्संख्येने अस्थायी सेवा, ४४ दिवस व तदनंतर ०१ दिवस तांत्रिक खंड याप्रमाणे १२ महिने कालावधीसाठी करार पद्धतीने, एकवट मानधनावर घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांची मुलाखत (Walk-in-Interview) घेणेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

संपूर्ण जाहिरात पुणे `महानगरपालिका संकेतस्थळ- www.pmc.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

| ही आहेत पदे

1 फिजिशियन – पदे ०५ – अर्हता – पदव्युत्तर पदवी

2 बधिरीकरण तज्ञ – पदे  ०२ – पदव्युत्तर पदवी

3. स्रीरोग तज्ञ – ०८ – पदव्युत्तर पदवी

4. बालरोग तज्ञ – ०९ – पदव्युत्तर पदवी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: