Rakesh Dhotre | वंचित बहुजन पर्यावरण आघाडीच्या पुणे जिल्हाअध्यक्ष पदी राकेश धोत्रे यांची नियुक्ती!
Vanhit Bahujan Aghadi – (The Karbhri News Service) – वंचित बहुजन पर्यावरण आघाडीच्या पुणे जिल्हाअध्यक्ष पदी राकेश धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune News)
धोत्रे यांना २१ वर्षांचा पर्यावरण क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यावरण विषयीचे अनेक प्रलंबित प्रश्न पुढील काळात मार्गी लावणार असल्याचे . धोत्रे यांनी सांगितले. भविष्य काळात पक्ष संघटनेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन पुणे जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन व संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण या बाबत अतिशय चांगले काम करणार असल्याचे यावेळी बोलताना धोत्रे यांनी सांगितले. बाळासाहेब आंबेडकरांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे त्याला साजेसं काम मी नक्की करून दाखविन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
–
भविष्य काळात पक्ष संघटनेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन पुणे जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन व संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण या बाबत अतिशय चांगले काम करणार. बाळासाहेब आंबेडकरांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे त्याला साजेसं काम मी नक्की करून दाखविन.
| राकेश धोत्रे

COMMENTS