PMC Employees One Day Salary | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार! 

Homeadministrative

PMC Employees One Day Salary | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार! 

Ganesh Kumar Mule Oct 17, 2025 8:47 PM

CM Devendra Fadnavis on Maharashtra Flood | संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maharashtra Flood | शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर|  नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता | केंद्राकडे प्रस्ताव सादर
Maharashtra Flood | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा

PMC Employees One Day Salary | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या ऑक्टोबर, महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही रक्कम जवळपास २ कोटी इतकी होते, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Maharashtra Flood)

राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्यभावनेने त्यांच्या माहे ऑक्टोबर,  च्या वेतनातून प्रत्येकी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून देण्याबाबत   शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार  या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून पुणे महानगरपालिका व शिक्षण विभागाकडील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले जाणार आहे. याबाबत प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे.

परिपत्रका नुसार एक दिवसाचे वेतन ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर, चे वेतनातून कपात केले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या  मूळ वेतन + महागाई भत्ता मिळून होणा-या एकूण रकमेच्या आधारे गणना करून कपात करण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांची मासिक वेतनातून रक्कम वसूल करण्यास हरकत असेल त्यांनी त्या आशयाचे वैयक्तिक पत्र संबंधित कार्यालयाच्या नियंत्रक / आस्थापना अधिकाऱ्यांकडे द्यायचे आहे.  जे अधिकारी / कर्मचारी निधीची रक्कम कपात करण्याबाबत लेखी हरकत घेतील त्यांच्या वेतनातून कपात केली जाणार नाही. असे परिपत्रकात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: