Bhide Bridge Pune | दिवाळी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन भिडे पूल  वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

Homeadministrative

Bhide Bridge Pune | दिवाळी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन भिडे पूल  वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Oct 08, 2025 5:30 PM

DSK Vishwa | डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार|स्वतंत्र जलवाहिनीसाठी महापालिकेकडून बारा लाखांचा निधी मंजूर
Ward Structure | जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
Water Cut In Pune on Thursday |  Water supply to the Merged villages should be restored without shutting down on Thursday  |  MP Supriya Sule’s demand

Bhide Bridge Pune | दिवाळी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन भिडे पूल  वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

 

Diwali 2025 – (The Karbhari News Service) – दिवाळीच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन ११ ऑक्टोबर पासून भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करावा. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे. (Pune Traffic Update)

 

मेट्रोच्या कामासाठी भिडे पूल सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. हा पूल २१ एप्रिल पासून ४५ दिवसांकरता बंद करण्यात आला होता. हे काम जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर त्या कामाला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देऊन भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला . त्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने गणपती उत्सवामुळे १५ दिवस मेट्रोचे काम थांबवून पूल वाहतुकीसाठी खुला केला गेला होता. त्यानंतर परत ९ सप्टेंबर पासून भिडे पूल एक महिन्याकरता वाहतुकीसाठी बंद केला आहे , ज्याची मुदत १० ऑक्टोबर रोजी संपत आहे.

वेलणकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि, दिवाळीनिमित्त आता लक्ष्मी रोड वर खरेदीची धामधूम सुरू होईल. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे लोक खरेदी उत्सव सुरु करण्याच्या तयारीत आहेत. नदीपात्रातील रस्त्यांवर फटाके स्टाॅलही आता सुरु होतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर पेठ भाग आणि नदीपात्रातील रस्त्यावर खूप वाहतूक कोंडी होऊ शकते. भिडे पुलावरून वाहतूक सुरु झाली तर परिस्थिती थोडी सुसह्य होईल. अशा परिस्थितीत सध्यातरी मेट्रोला कोणतेही extension न देता शनिवार ११ तारखेपासून किमान दिवाळी संपेपर्यंत तरी भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी आग्रहाची मागणी आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: