PMC Ward 41 – Mohhamadwadi Undri | प्रभाग क्रमांक ४१ – महंमदवाडी – उंड्री | प्रभाग रचनेतील शेवटच्या प्रभागाची हद्द आणि रचना जाणून घेऊ
Pune PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – महंमदवाडी – उंड्री पुणे महापलिका प्रारूप प्रभाग रचनेतील ४१ वा म्हणजे शेवटचा प्रभाग. होळकरवाडी, हांडेवाडी, वडाची वाडी, पिसोळी, उंड्री, सय्यदनगर, मोहंमदवाडी असे परिसर या प्रभागात मोडतात. या प्रभागाची सविस्तर रचना आपण जाणून घेऊयात. (Pune Corporation Election 2025)
प्रभाग क्रमांक ४१ – महंमदवाडी – उंड्री
लोकसंख्या एकूण ८६९६२ – अ. जा. १०५१५ – अ. ज. ११८५
निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्ती: होळकरवाडी, हांडेवाडी, वडाची वाडी, पिसोळी, उंड्री, सय्यदनगर, मोहंमदवाडी, गंगा व्हिलेज परिसर, गिनी संस्कृती, रुणवाल सीगुल एच. एम. रॉयल सोसायटी, शोभा कार्नेशन, कुमार प्रिन्स टाऊन, न्याती एरिस मार्वल सांग्रीया, होळकर पाटील नगर, कुमार पेबल पार्क सोसायटी, मेजेस्टीक रिदम काऊंटी, पॅलेस ऑर्चीड, आतुर नगर, बालाजी पद्मावती नगर, कुमार पाल्म क्रेस्ट रहेजा व्हिस्टा, हेवन पार्क, दोराबजी पॅरेडाईज, जरांडे नगर, कृष्णा नगर, रहेजा रिझर्व्ह, इ.
उत्तर: मौजे हडपसर, मौजे वानवडी व मौजे मोहंमद वाडी यांची हद्द एकमेकास जेथे मिळते तेथून पूर्वेस मौजे हडपसर व मौजे मोहंमद वाडी यांचे हद्दीने सय्यदनगरच्या पश्चिमेकडील नाल्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर नाल्याने ससाणे नगर रस्त्यास (पंचरत्न, पितृछाया या इमारतीच्या उत्तरेकडील रस्ता ) मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने पुणे मिरज रेल्वे लाईनला मिळेपर्यंत, तेथून दक्षिणपूर्वेस पुणे मिरज रेल्वे लाईनने मौजे हडपसर व मौजे फुरसुंगीच्या मनपा हद्दीस मिळेपर्यंत.
पुर्व: पुणे मिरज रेल्वे लाईन मौजे फुरसुंगीच्या मनपा हद्दीस जेथे मिळते तेथून दक्षिणेस मौजे फुरसुंगी व मौजे उरुळी देवाची गावांच्या हद्दीने व पुढे मौजे उरुळी देवाची मौजे हांडेवाडी व मौजे होळकरवाडी गावांच्या पूर्वेकडील मनपा हद्दीने (मौजे वडकी गावाच्या) मौजे होळकरवाडीच्या दक्षिणेकडील मनपा हद्दीस मिळेपर्यंत.
दक्षिणः मौजे होळकरवाडीची पूर्वेकडील मनपा हद्द मौजे होळकरवाडीच्या दक्षिणेकडील हद्दीस जेथे मिळते तेथून पश्चिमेस मौजे होळकरवाडी, मौजे हांडेवाडी व मौजे वडाची वाडी यांच्या दक्षिणेकडील मनपा हद्दीने मौजे वडाचीवाडी व मौजे येवलेवाडी यांच्या मनपा हद्दीस मिळेपर्यंत.
पश्चिमः मौजे वडाचीवाडी यांची दक्षिणेकडील हद्द मौजे येवलेवाडीच्या दक्षिणेकडील हद्दीस जेथे मिळते तेथून उत्तरेस मौजे वडाचीवाडी व मौजे येवलेवाडी यांच्या सामायिक हद्दीने व पुढे उत्तरेस मौजे पिसोळी व मौजे येवलेवाडीच्या सामाईक हद्दीने व पुढे मौजे पिसोळी व मौजे कोंढवा बुद्रुक यांचे सामाईक हद्दीने पुण्यधाम आश्रम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस पुण्यधाम आश्रम रस्त्याने व पुढे मौजे उंड्री मधील बाजीराव रस्त्याने ट्युलीप व्हिला च्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत. तेथून उत्तरेस NIBM उंड्री रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरपश्चिमेस सदर रस्त्याने NIBM मोहंमदवाडी रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून उत्तरेस एन.आय.बी.एम. रस्त्याने मौजे कोंढवा खुर्द आणि मौजे मोहंमद वाडी यांचे हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस मौजे कोंढवा खुर्द आणि मौजे मोहंमद वाडी यांचे हद्दीने पुढे उत्तरेस मौजे वानवडी आणि मौजे मोहंमद वाडी यांचे हद्दीने मोहंमदवाडी खिडीतला रस्ता ओलांडून मौजे हडपसर व मौजे वानवडी यांचे हद्दीस मिळेपर्यंत.

PMC Ward 41 – Mohhamadwadi Undri Map
COMMENTS