PMC Ward 35 – Suncity Manik Bagh | प्रभाग क्रमांक ३५ – सनसिटी माणिक बाग  | प्रभागाची व्याप्ती आणि राचा सविस्तर जाणून घ्या! 

Homeadministrative

PMC Ward 35 – Suncity Manik Bagh | प्रभाग क्रमांक ३५ – सनसिटी माणिक बाग  | प्रभागाची व्याप्ती आणि राचा सविस्तर जाणून घ्या! 

Ganesh Kumar Mule Sep 11, 2025 9:02 PM

Progress Report | PMC Pune | 25 कोटींच्या वरील कामाचा दर 15 दिवसांनी आयुक्तांना अहवाल द्यावा लागणार
Mobile phone number while purchasing goods | वस्तू खरेदीवेळी भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक नाही | जिल्हा पुरवठा अधिकारी
PMC Vaccination Drive | पुणे महापालिका आगामी तीन महिने राबवणार लसीकरण मोहीम | लहान मुले आणि गरोदर मातांना लाभ

PMC Ward 35 – Suncity Manik Bagh | प्रभाग क्रमांक ३५ – सनसिटी माणिक बाग  | प्रभागाची व्याप्ती आणि राचा सविस्तर जाणून घ्या!

 

Pune Municipal Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील ३५ व्या क्रमांकांचा प्रभाग म्हणजे सनसिटी माणिक बाग. सनसिटी परिसर, सिंहगड टेक्निकल इन्स्टीटयूट, वडगाव (बु) भाग, असे विविध परिसर यात मोडतात. या प्रभागाची व्याप्ती आणि रचना आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Pune PMC Election 2025)

 

प्रभाग क्रमांक ३५ – सनसिटी माणिक बाग

लोकसंख्या एकूण ७८४९३ – अ. जा. ४८२३ – अ. ज. ५४४

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या  – ४

व्याप्ती: सनसिटी परिसर, सिंहगड टेक्निकल इन्स्टीटयूट, वडगाव (बु) भाग, गणेश पार्क, किर्तीनगर, शिवशक्ती सोसायटी, शेवंताबाई नामदेव दागंट शाळा, वडगाव जलशुध्दीकरण केंद्र, तुकाईनगर, माणिक बाग. जाधवनगर, सिंहगड रोड टेलिफोन एक्सचेंज, हिंगणे खुर्द, आनंदनगर, स्वरनगरी सोसायटी, मोहिते टाऊनशिप, वर्षानंद सोसायटी एकता नगर. इ.

उत्तर व पूर्वः मौजे वडगांव बु., मौजे वडगांव खुर्द यांच्या हद्दीवरील नाला मुठा नदीस जेथे मिळतो. तेथून पूर्वेस मुठा नदीने मींटे रोझा प्रकल्पाच्या पश्चिम दक्षिणेस असलेल्या रस्त्याच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत, तेथून दक्षिण-पूर्वेस सदर रेषेने व पुढे रस्त्याने नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरपूर्वेस मौजे हिंगणेखुर्द मधील जनता सहकारी बँकेच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस सरस्वती विहार इमारतीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस व पुढे पूर्वेस सरस्वती विहार इमारतीच्या दक्षिणेकडील हद्दीने तरडे कॉलनी मधील उत्तरदक्षिण रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने आनंदनगर गल्ली क्र. ५ ला मिळेपर्यंत तेथून पूर्वेस गल्ली क्र. ५ ने मुठा कालव्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस कॅनॉलने सिंहगड ऑटो गॅरेज च्या उत्तरेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने व पुढे आनंदविहार कॉलनी रस्त्याने श्री. तोडकर निवास यांचे दक्षिणेकडील हद्दी जवळ मौजे हिंगणे खुर्द व पाचगाव पर्वतीच्या हद्दीस मिळेपर्यंत. तेथून उत्तरेस व पुढे पांचगांव पर्वतीच्या पश्चिमेकडील व दक्षिणेकडील हद्दीने मौजे वडगाव बुद्रुक मधील एसकेएन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट च्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिण व पश्चिमः  पांचगांव पर्वतीच्या दक्षिणेकडील हद्द मौजे वडगाव बुद्रुक मधील एसकेएन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट च्या उत्तरेकडील रस्त्यास जेथे मिळतो तेथून पश्चिमेस सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट च्या उत्तरेकडील रस्त्याने सिंहगड इन्स्टिट्यूटच्या पश्चिमेकडील उत्तरदक्षिण रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने श्रीनाथ कॉम्प्लेक्स इमारतीच्या उत्तरेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने सिंहगड दर्शन इमारतीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर हद्दीने जुन्या पाण्याच्या टाकीजवळ स्वप्नपूर्ती इमारत, चामुंडा इमारत, रामराज्य हाइटस इमारत यांच्या उत्तरेकडील रस्त्याच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर सरळ रेषेने व पुढे स्वप्नपूर्ती इमारत, चामुंडा इमारत, रामराज्य हाइटस इमारत यांच्या उत्तरेकडील रस्त्याने व पुढे पश्चिमेस सदर रस्त्याच्या सरळरेषेने न्युक्लिअस वल्ड स्कूल आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर हद्दीने व पुढे उत्तरेस स्वामी धान्य भांडार इमारतीच्या पूर्वेकडील हद्दीने स्व. महेंद्र दांगट पाटील स्मृती या इमारतीच्या तसेच कै.ह.भ.प. शांताबाई खंडेराव खडसरे दवाखान्याच्या दक्षिणेकडील हद्दीच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रेषेने व पुढे सदर हद्दीने कै. गंगाराम भाऊसाहेब दांगट (पाटील) उर्फ बबन पाटील चौक येथे साईबाबा मंदिराच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस व पुढे उत्तरेस सदर रस्त्याने साई आंगण इमारतीच्या दक्षिणेकडील पूर्वपश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून • पश्चिमेस सदर रस्त्याने श्रीमती शेवंताबाई नामदेव दांगट मुलींचे प्राथमिक विद्यालयाची कमान ओलांडून दांगटपाटील मार्केट पॉइंट इमारतीच्या उत्तरेकडील हद्दीस (दांगट गार्डन इमारतीच्या उत्तरेकडील हद्द) मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने नाल्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर नाल्याने सिंहगड रस्त्यास नाहटा स्पोर्ट कॉम्प्लेक्स जवळ मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सिंहगड रस्त्याने कात्रज देहूरोड रस्ता ओलांडून मौजे वडगाव बुद्रुक व मौजे वडगाव खुर्द यांचे हद्दीवरील नाल्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर हद्दीवरील नाल्याने मुठा नदीस मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

PMC ward 35 Suncity Manik Bagh Map

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0