Sound Pollution Pune Ganesh Immersion 2025 | गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाज येत चाललाय खाली! | विसर्जनात सरासरी ९२.६ डेसिबल आवाज
| ध्वनी प्रदूषण बाबत जागृती तर होऊ लागली | मागील वर्षी होता ९४.८ डेसिबल्स
Pune Ganesh Immersion Sound Pollution – (The Karbhari News Servcie) – गणेश विसर्जनाच्या निमित्ताने गेल्या २५ वर्षांपासून पुण्यातील रहिवासी ध्वनिप्रदूषणाने हैराण झाले आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले होते. मात्र यंदा हा आवाज मागील वर्षा पेक्षा देखील कमी झालेला दिसून आला. प्रशासनाने डीजे वाजवण्यावर आणलेले निर्बंध यामुळे हे शक्य झाले. तसेच कार्यकर्त्यांनी आणि भाविकांनी देखील ध्वनी प्रदूषण बाबत जागृती केली. गणेश विसर्जन मिरवणुकीत एकंदर आवाज गेल्या वर्षीपेक्षा कमी होऊन सरासरी ९४.८ डेसिबल्स वरून तो ९२.६ नोंदवला गेला आहे. सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठ च्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी हे मूल्यांकन केले आहे. (Pune Sound Pollution)
– आवाजाचे मापन मुख्य १० चौकांमध्ये केले जाते
दरवर्षी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख १० चौकांचे ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी सीईओपी विद्यापीठाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांकडून सरावा केला जातो. यामध्ये बेलबाग चौक, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, कुंटे चौक, उंबर्या गणपती चौक, भाऊसाहेब गोखले चौक, शेडगे विठोबा चौक, होळकर चौक, लोकमान्य टिळक चौक, खंडूजीबाबा चौक अशा चौकांचा समावेश आहे. या संदर्भात विद्यापीठाच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ.महेश शिंदीकर म्हणाले की, महाविद्यालयाकडून गेल्या २५ वर्षांपासून हे काम केले जात आहे. यंदा ६ व ७ सप्टेंबर च्या दिवशी ही निरीक्षणे नोंदवल गेली.
शिंदीकर म्हणाले, पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत २४ तासातील आणि १० चौकातील सरासरी आवाजाची पातळी गेल्या काही वर्षीपेक्षा कमी ९२.६ डेसिबेल्स आवाज होता. स्थलकालपरत्वे (spatio-temporal) आणि शास्त्रीय (Scientific) पद्धतीने केलेली मोजणी. केवळ अभ्यास, जनजागृती आणि संशोधन करताना या मिरवणुकीच्या दरम्यान चौकात उभ्या असलेल्या सामान्य माणसाच्या कानावर पडणा-या आवाजाची नोंद केली गेली आहे. गेल्या काही वर्षात कार्यकर्ते आणि भाविक यांच्यात ध्वनीप्रदुषणाबाबत जागृती वाढली आहे. आवाजाच्या पातळी मोजण्याच्या प्रक्रियेबद्दल देखील उत्सुकता मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांनी या कामात स्वत:हून मदत केली. पोलीस, प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि मंडळ व्यवस्थापक आणि भाविक यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे साध्य झाले आहे. अधिकाधिक पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात आला, रात्री डी जे सिस्टिम्सवर नियंत्रण, साधारण चौकातील सर्व वेळातील आवाज तुलनेने कमी होता सकाळी ८ वा. पुन्हा दणदणाट सुरु झाला. एकूण गर्दी नियंत्रण आणि आमच्या मापन नियोजनात पुणे मेट्रोचा लक्षणीय सहभाग घेतला. असे शिंदीकर यांनी सांगितले.
शिंदीकर यांनी पुढे सांगितले कि, सर्वात कमी आवाजाची नोंद म्हणजे ६१.६ डेसिबल आवाज ६ सप्टेबर ला खंडूजी बाबा चौकात दुपारी १२ वाजता झाली. तर सर्वात जास्त आवाज म्हणजे १०९ डेसिबल हा ७ सप्टेंबर ला सकाळी ८ वाजता खंडूजी बाबा चौकात नोंद झाली.
या वर्षीच्या मोजणीसाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या निसर्ग या पर्यावरण अभ्यास गटाच्या सुमारे २५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :-
नियोजन : Mohit Kandalkar (मोहित कांडलकर), Shreya Karande (श्रेया कारंडे )
विद्यार्थी स्वयंसेवक: Mrunal Khutemate (मृणाल खुटेमाटे), Sumedh Brahmankar (सुमेध ब्राह्मणकर), Arya Ghadge (आर्या घाडगे), Aditi Talokar (अदिती तळोकार ), Shravni Shinde (श्रावणी शिंदे), Krish Kholiya (क्रिश खोलिया), Atharv Rakhonde (अथर्व राखोंडे ), Prathmesh Podhade (प्रथमेश पोधाडे), Om Sonawane (ओम सोनवणे), Shantanu Kele ( शंतनु केले), Sanchita Patil ( संचिता पाटील), Om Behare (ओम बेहरे), Sahil Agrawal (साहिल अग्रवाल ), Bhoomika Awachat (भूमिका अवचट), Aditya Sanjeevi ( अदित्य संजीवी), Kartik Gaikhe (कार्तिक गायखे), Suyog Sawant (सुयोग सावंत), Adarsh Choudhury (आदर्श चोधरी), Utkarsha Kakad ( उत्कर्षा काकड), Asmita Gogate (अस्मिता गोगटे), Swarali Awalkar (स्वराली आवळकर), Siddharth Shidid ( सिद्धार्थ शिडीद), Vedant Joshi (वेदांत जोशी) आणि Mehar Raghatate ( मेहर रघाटाटे)
– आवाज पातळी
वर्ष. आवाज पातळी (डेसिबल)
2008 – 101.4
2010 – 100.9
2012. – 104.2
2013. – 109.3
2016. – 92.6
2018. – 90.4
2019. – 86.2
2020. – 59.8
2022. – 102.5
2023. – 101.2
2024. – 94.8
2025 – 92.6

COMMENTS