Pune PMC News | बाणेर बालेवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई  | 14650 चौ.फूट विनापरवाना  बांधकाम हटवले

Homeadministrative

Pune PMC News | बाणेर बालेवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई  | 14650 चौ.फूट विनापरवाना  बांधकाम हटवले

Ganesh Kumar Mule Aug 29, 2025 7:48 PM

Baner Fire Station | बाणेरमध्ये अग्निशामक केंद्र सुरु | अमोल बालवडकर यांचा पाठपुरावा 
Baner-Balewadi Water issue | अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश 
Water problem of Baner Balewadi | बाणेर बालेवाडी च्या गंभीर पाणी प्रश्ना बाबत महापालिका अधिकारी निष्क्रिय | अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांचे  ४ ते ५ तास ठिय्या आंदोलन

Pune PMC News | बाणेर बालेवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई  | 14650 चौ.फूट विनापरवाना  बांधकाम हटवले

 

PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे पेठ बालेवाडी सर्वे नंबर 32 येथे दोन मजली आर सी सी बांधकाम jow cutter च्या सहाय्याने पडण्यात आले. तसेच बाणेर मुख्य रस्ता डावी बाजू व पॅन कार्ड क्लब रोड येथे अनधिकृत दुकाने, हॉटेल्स, पत्रा शेड व पक्क्या स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवर  29 रोजी बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

सदर कारवाई मध्ये सुमारे 14650 चौ.फूट विनापरवाना आर सी सी बांधकाम व अनधिकृत क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता, बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर स्टाफ, सहा. पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने व एक जेसीबी, एक गॅस कटर, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: