PMC Property Tax Department | चालू आर्थिक वर्षात पहिल्या चार महिन्यांत 27 हजारहून अधिक नवीन मिळकतीची आकारणी!
| मागील वर्षापेक्षा 10 हजाराने अधिक आकारणी
Pune Property Tax – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 27329 नवीन मिळकतीची आकारणी केली आहे. त्यातून पालिकेला 168 कोटी उत्पन्न मिळणार आहे. मागील वर्षी 16558 मिळकतीची आकारणी केली होती. त्यातून पालिकेच्या तिजोरी 100 कोटी जमा झाले होते. यंदा पालिकेने मजल मारलेली दिसून येत आहे. (Pune Municipal Corporation property tax Department)
मागील वर्षी पहिल्या चार महिन्यात 1574 कोटी उत्पन्न मिळाले होते. या वर्षी हे उत्पन्न 1571 कोटी इतके आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी 40 सवलत दिली जात नव्हती. त्याचे महापालिकेला 100 कोटी मिळाले होते. मात्र या वर्षी सव्वा लाख मिळकत धारकांना 40 टक्के सवलत दिली आहे. असे असून देखील विभागाने एवढे उत्पन्न मिळवले आहे.
खात्याने या आर्थिक वर्षात 3 हजार कोटी उत्पन्न मिळवण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यानुसार विभागाने नियोजन केले आहे, दरम्यान पहिल्या तीन ते चार महिन्यात ५० टक्के टार्गेट पूर्ण झाले आहे. कर्मचाऱ्यांना दोन उदिष्ट दिलेले आहे. त्यानुसार नवीन १ लाख मिळकतींची आकारणी करण्याचे काम देण्यात आले आहे. तर पूर्ण वर्षाची वसुली हि ३ हजार कोटी करण्याचे उदिष्ट दिले आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रानुसार विविध उदिष्ट देण्यात आले आहेत. लवकरच वसुलीची मोहीम तीव्र केली जाणार आहे. असे मिळकत कर विभागाने सांगितले.

COMMENTS