Vadgaonsheri Constituency | अनियमित पाणीपुरवठ्या वरून माजी नगरसेवकाचे मुंडन आंदोलन 

Homeadministrative

Vadgaonsheri Constituency | अनियमित पाणीपुरवठ्या वरून माजी नगरसेवकाचे मुंडन आंदोलन 

Ganesh Kumar Mule Aug 26, 2025 7:09 PM

HSRP Number Plate | HSRP नंबरप्लेटची सक्ती रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन
NCP-SCP Pune | राज्य सरकारच्या  विरोधात तीव्र निषेध आंदोलन
NCP -SCP on Inflation | पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एल्गार आंदोलन

Vadgaonsheri Constituency | अनियमित पाणीपुरवठ्या वरून माजी नगरसेवकाचे मुंडन आंदोलन!

 

Adv Bhayyasaheb Jadhav – (The Karbhari News Service)  – वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमधील विविध भागांमध्ये जसे कि, खराडी ,वडगावशेरी, विमान नगर, लोहगाव या परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठ्याच्या बाबतीत वारंवार चर्चा करूनही पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोणताही पाठपुरावा न केल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे निषेध म्हणून माजी नगरसेवक अॅड. भैय्यासाहेब जाधव  यांनी मुंडन करून निषेध करण्यासाठी प्रयत्न केला. (PMC Water Supply Department)

आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे तसेच मतदार संघातील नागरिक उपस्थित होते.  वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमधील विविध भागांमध्ये खराडी ,वडगावशेरी ,विमान नगर ,लोहगाव या परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठ्याच्या बाबतीत वारंवार चर्चा करूनही पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोणताही पाठपुरावा करण्यात आला नाही. याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. पाणीपुरवठा विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. (MLA Bapu Pathare)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: