PMC Cultural Centre Department | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त पुणे महापालिकेकडून  पालखी मिरवणूक सोहळा

Homeadministrative

PMC Cultural Centre Department | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त पुणे महापालिकेकडून  पालखी मिरवणूक सोहळा

Ganesh Kumar Mule Aug 16, 2025 6:32 PM

Prashant Jagtap | PMC Election 2022 | कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजप 
Marathi Language in Administration | मायमराठी व्हावी लोक प्रशासनाची भाषा | ‘प्रशासनातील मराठी भाषा’ परिसंवादात सनदी अधिकाऱ्यांची भूमिका
Pune RMC Association | आरएमसी प्रकल्पांमधून रेडी मिक्स कॉंक्रिटचे उत्पादन आणि पुरवठा स्थगित | पुणे आरएमसी असोसिएशनकडून कारवाईचा निषेध!

PMC Cultural Centre Department | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त पुणे महापालिकेकडून  पालखी मिरवणूक सोहळा

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका आणि भारतीय वारकरी मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५० वर्ष) जयंती वर्षा निमित्त भव्य पालखी मिरवणूक सोहळा १५ ऑगस्ट रोजी सायं ५ ते ७ या वेळेत सांस्कृतिक केंद्रे विभाग पुणे मनपा यांनी आयोजित केला होता. (Sant Dnyaneshwar Maharaj)

कार्यक्रमाची सुरुवात पुणे मनपा मुख्य भवन येथे ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांचे हस्ते श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून पूजा करून पालखी मिरवणूक सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सांस्कृतिक केंद्रे विभागाचे उपायुक्त  सुनिल बल्लाळ, पुणे मनपाचे मुख्य कामगार अधिकारी  नितीन केंजळे, सांस्कृतिक केंद्रे विभागाचे मुख्य व्यवस्थापक तथा प्रशासन अधिकारी  राजेश कामठे, प्रशांत चव्हाण, श्रीधर चव्हाण, अमर कोळी इत्यादी अनेक मनपा सेवक उपस्थित होते. तसेच भारतीय वारकरी मंडळाचे अभय टिळक,  अखिल जांजले, श्री तुरे असे अनेक वारकरी सांप्रदायिक जनसमुदाय पालखी सोहळ्यास उपस्थित होते.

भारतीय वारकरी मंडळातर्फे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त . सुनिल बल्लाळ, मुख्य कामगार अधिकारी  नितीन केंजळे, सांस्कृतिक केंद्राचे मुख्य व्यवस्थापक  राजेश कामठे यांचा सन्मान करणेत आला.

 

The Karbhari - Pune PMC News

पालखी मिरवणूक पुणे मनपा मुख्य भवन येथून सुरू झाले नंतर ५१ शंखवादक विद्यार्थिनी शंखनाद करून मिरवणुकीत सुरुवात करणेत आली. पुणे मनपा मुख्य भवन, काँग्रेस भवन मार्गे, झाशीची राणी चौक ते घोले रोड ते पुढे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पादुका चौकामध्ये आरती घेऊन पुढे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक येथील विठ्ठल मंदिर येथे श्री. सुनिल बल्लाळ, श्री नितीन केंजळे आणि श्री. राजेश कामठे यांचे हस्ते आरती करून पालखी मिरवणुकीची सांगता करणेत आली.

पालखी सोहळ्यास पुणे मनपाचे अधिकारी सेवक भारतीय वारकरी मंडळाचे अनेक पदाधिकारी, वारकरी अनेक महिला, लहान मुले, अनेक पुणेकर नागरिक सहभागी झाले होते. ज्ञानोबा-तुकाराम या नावाचा जयघोष होऊन सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार झाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: