Omprakash Divate PMC | पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचा सद्यस्थितीचा तपशील देण्याबाबत विविध विभागांची उदासीनता  | अतिरिक्त आयुक्तांनी दिले स्मरणपत्र 

Homeadministrative

Omprakash Divate PMC | पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचा सद्यस्थितीचा तपशील देण्याबाबत विविध विभागांची उदासीनता  | अतिरिक्त आयुक्तांनी दिले स्मरणपत्र 

Ganesh Kumar Mule Aug 11, 2025 8:56 PM

Prasanna Jagtap | विश्रांतीनगर कॅनॉल रोड ते वडगाव चरवड गार्डन या कॅनॉल जवळील ट्रॅकवरील झाडेझुडपे प्रशासन कधी काढणार? | माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांचा सवाल
PMC Employees Transfer | प्रशासकीय आणि अभियांत्रिकी संवर्गातील ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनानुसार होणार बदल्या!
Tobacco Free Office | आता कार्यालय व परिसरात तंबाखू खाणे पडणार महागात! 

Omprakash Divate PMC | पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचा सद्यस्थितीचा तपशील देण्याबाबत विविध विभागांची उदासीनता  | अतिरिक्त आयुक्तांनी दिले स्मरणपत्र

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  महानगरपालिकेच्या मालकीच्या विविध मालमत्ता आहेत. त्यांच्या सद्यस्थितीचा तपशील देण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी विविध विभागांना आदेश दिले होते. मात्र याबाबत विविध विभागांची उदासीनता दिसून आली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्मरणपत्र देत १८ ऑगस्ट पर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

 

पुणे महानगरपालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड, बांधीव इमारती ( हॉस्पिटल्स, शाळा, भाजी मंडई, विरंगुळा केंद्रे, बहुउद्देशीय हॉल, आरोग्य केंद्रे, वाचनालये, अभ्यासिका, समाज मंदिरे, अग्निशमन केंद्रे, आर – ७ अंतर्गत निवासी इमारती, व्यावसायिक इमारती, पार्किंग प्लेस इत्यादी), अॅमिनिटी स्पेस या मिळकतींचे जतन, संरक्षण व देखभाल दुरुस्ती करणे, खाजगी संस्था / व्यक्ती तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांना भाडेपट्ट्याने दिलेल्या मिळकतीचे भाडे वसुली करणे, उपाययोजना करणे, महसूल वाढीसाठी प्रयत्न करणे इ. बाबत योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने मालमत्ता व्यवस्थापन विभाग, क्रीडा विभाग, उद्यान विभाग, आरोग्य विभाग, मंडई विभाग,समाज विकास विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक), शिक्षण विभाग (माध्यमिक), भवन रचना विभाग व माहिती तंत्रज्ञान विभागास  कार्यालयीन आदेशाद्वारे मालमत्तांचे सद्यस्थितीचा तपशील google spreadsheet मध्ये भरून त्वरित माहिती सादर करणेबाबत तसेच आवश्यक उपाययोजना करणेबाबत निर्देशित करण्यात आले होते, तसेच त्याबाबतचा कालबद्ध नियोजन आराखडा  १८.०७.२०२५ पर्यंत आणि कार्यपूर्ती अहवाल दि.३१.०७.२०२५ अखेर सादर करण्याचे कळविण्यात आले होते. तथापि काही विभागांनी माहिती भरलेली असून काही विभागांनी परिपूर्ण माहिती भरलेली नाही.

तरी सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी  आदेशानुसार केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल १८ पर्यंत सादर करावा. याबाबत १९ रोजी सर्व संबंधित विभागप्रमुखांची आढावा बैठक आयोजित केली जाईल. असे आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: