Pune Potholes | शहरातील खड्ड्यावरून शिवसेनेचा महापालिका प्रशासनाला अल्टिमेटम | महापालिका भवनावर मोर्चा काढण्याचा प्रमोद नाना भानगिरे यांचा इशारा

Homeadministrative

Pune Potholes | शहरातील खड्ड्यावरून शिवसेनेचा महापालिका प्रशासनाला अल्टिमेटम | महापालिका भवनावर मोर्चा काढण्याचा प्रमोद नाना भानगिरे यांचा इशारा

Ganesh Kumar Mule Aug 01, 2025 10:11 PM

Pune Rain | महापालिका प्रशासनाने बाधित कुटुंबांचे पंचनामे लवकर करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी | डॉ. नीलम गोऱ्हे
Pune Shivsena | भारतीय सेनेच्या शौर्याला हडपसरमध्ये मिठाई वाटून सलाम!
Pramod Nana Bhangire | संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा दया- प्रमोद नाना भानगिरे

Pune Potholes | शहरातील खड्ड्यावरून शिवसेनेचा महापालिका प्रशासनाला अल्टिमेटम | महापालिका भवनावर मोर्चा काढण्याचा प्रमोद नाना भानगिरे यांचा इशारा

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – शहरात विविध ठिकाणी झालेले खड्डे आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास यावरून आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या दोन तीन दिवसात खड्डे नाही बुजवले तर येत्या गुरुवारी महापालिका भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. (PMC Road Department)

औंध परिसरात खड्यामुळे एका व्यक्तीला आपल्या प्राणाचे मोल द्यावे लागले. यावरून शहरात प्रशासन विषयी चीड निर्माण झाली आहे. यावरून आता शिवसेनेने देखील महापालिका प्रशासनाला घेरले आहे. याबाबत शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले की, याला प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. आम्ही देखील नुकताच शहराचा दौरा केला होता. त्यात आम्हाला शहरात विविध ठिकाणी खड्डे असल्याचे आढळून आले होते. याबाबत प्रशासनाला अवगत देखील करण्यात आले आहे. तरी देखील प्रशासनाला जाग आलेली नाही.

भानगिरे यांनी सांगितले की, प्रशासनाला आम्ही २-४ दिवसांचा अल्टिमेटम देत आहोत. तोपर्यंत शहरातील खड्डे नाही दुरुस्त केले तर येत्या गुरुवारी महापालिका भवनावर भव्य मोर्चा काढला जाईल. त्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर असेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: