PMC Scholarship For 10th, 12th Student | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजनेसाठी पुणे महापालिकेने मागवले अर्ज | कधी पर्यंत करू शकता अर्ज? जाणून घ्या सविस्तर
योजनेचे नाव
०१. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना
०२. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना
या असतील अटी
१. खुल्या गटातील विद्यार्थ्यांना सन २०२५ फेब्रुवारी – मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १० वी व इ. १२ वी मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे आवश्यक आहे.
२. पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी / रात्रशाळेतील विद्यार्थी / मागासवर्गीय विद्यार्थी यांना किमान ७०% गुण आवश्यक.
३. ४०% च्या पुढील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना ५५% गुण, | कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम | करणाऱ्या सर्व असंघटित कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान ६५% गुण असणे आवश्यक आहे.
४. अंध विद्यार्थी इ. १० वी किंवा इ. १२ वी मध्ये उत्तीर्ण झाल्यास टक्केवारी न पाहता लाभ देणेत येईल.
५. शैक्षणिक अर्थसहाय्य योजना ही इ. १० व इ. १२ वी नंतर शासनमान्य / | विद्यापीठाकडून मान्यता मिळालेल्या संस्थेत प्रवेश घेतलेल्या पुणे महानगरपालिकेच्या | कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीताच आहे.
या योजनेचे अर्ज ०१/०८/२०२५ ते दि. ३१/१२/२०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने abt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरणेत यावेत. ३१/१२/२०२५ रोजी सायं. ०५.३० वा. संकेतस्थळावर अर्ज भरणेची सुविधा बंद करणेत येईल.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणेकरीता सूचना
१) लाभार्थ्याने यापूर्वी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केले असल्यास त्याच user id व password ने अर्ज भरावा. नवीन लाभार्थ्यांनी नागरिक login द्वारे नविन रजिस्ट्रेशन करून user id व password च्या आधारे अर्ज भरावा.
२) मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांनी मागासवर्गीय कल्याणकारी योजना व खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी युवककल्याणकारी योजने अंतर्गत अर्ज भरणे आवश्यक आहे.
३) अर्ज पालकांच्या नावे भरणे आहे.
४) संकेतस्थळावर नमूद केलेल्या अटी व शर्ती नुसार मूळ ( Original) कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
५) dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेबाबतचा नमुना ( हमीपत्र ) उपलब्ध करून देणेत आला आहे. त्यानुसार माहिती पालक व प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयांनी भरल्यानंतरच सदरचे हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
६) लाभार्थी CBSE/ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळा / महाविद्यालयाकडून टक्केवारी प्रमाणपत्र आणण्याची जबाबदारी पालकांची असून सदरचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
७) शैक्षणिक अर्थसहाय्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.
८) अटी व नियमांप्रमाणे भरलेल्या अर्जांचा विचार केला जाईल. तसेच नाकारणेत आलेल्या अर्जाबाबत अर्जदाराने दिलेल्या मुदतीमध्ये आक्षेप पुर्तता केल्यास सदर अर्जावर पुढील कार्यवाही केली जाईल. मुदतीमध्ये आक्षेप पुर्तता न केल्यास अर्ज पूर्णतः रद्द करणेत येईल.
९) अर्ज भरताना अर्जदाराने अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवल्यास व सदरचा अर्ज सादर (Submit) न केल्यास अशा अजांचा विचार केला जाणार नाही. या बाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची राहिल. यासाठी कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात येणार नाही.
१०) अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर अर्जाबाबतची सद्यस्थिती लॉगिनद्वारे जाणून घेण्याची जबाबदारी नागरिकांची राहील. ११) फुरसुंगी – उरुळी देवाची नगरपरिषद झाल्याने या गावातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही… १२) तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयामध्ये असलेल्या समाज विकास विभागाकडील कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधावा. १३) सदर योजने बाबतचा संपुर्ण तपशील तसेच अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

COMMENTS