PMC Water Supply Department | पुणे म.न.पा.ची पाणी घेण्याच्या उपसा केंद्रामधील सर्व यंत्रणा जलसंपदा विभागाच्या ताब्यात द्या  | पाटबंधारे विभागाने पुन्हा पाणीपुरवठा विभागाला डिवचले 

Homeadministrative

PMC Water Supply Department | पुणे म.न.पा.ची पाणी घेण्याच्या उपसा केंद्रामधील सर्व यंत्रणा जलसंपदा विभागाच्या ताब्यात द्या  | पाटबंधारे विभागाने पुन्हा पाणीपुरवठा विभागाला डिवचले 

Ganesh Kumar Mule Jul 24, 2025 9:22 PM

Pune Water Cut News | पुणेकरांनो पाणी जपून वापरा | महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकेत
Pune Water Issue | भरभरून मते देणाऱ्या पुणेकरांची हक्काच्या पाण्यासाठी भाजपकडून अडवणूक!
Pune Water Supply | पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले २०५२ पर्यंतच्या पाण्याचे नियोजन | पाटबंधारे विभागाकडे मागितले ३४.७१ टीएमसी पाणी!

PMC Water Supply Department | पुणे म.न.पा.ची पाणी घेण्याच्या उपसा केंद्रामधील सर्व यंत्रणा जलसंपदा विभागाच्या ताब्यात द्या  | पाटबंधारे विभागाने पुन्हा पाणीपुरवठा विभागाला डिवचले

 

Pune Irrigation Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचा पाणीवापर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण   च्या मापदंडानुसार नियंत्रित करणेसाठी पुणे म.न.पा.ची पाणी घेण्याच्या उपसा केंद्रामधील सर्व यंत्रणा जलसंपदा विभागाच्या ताब्यात द्या. अशी मागणी पुणे पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. या आधी देखील पाटबंधारे विभागाने अशी मागणी केली होती. मात्र महापालिकेने पाटबंधारे च्या या पत्राला केराची टोपली दाखवली होती. मात्र पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा महापालिकेला डिवचले आहे. (Department of Water Resources)

पुणे महानगरपालिकेचा पाणीवापराबाबत अध्यक्ष, म.ज.नि.प्रा. यांचे अध्यक्षतेखाली ७.११.२०२४ रोजी बैठक संपन्न झाली. बैठकीच्या इतीवृत्तामध्ये उपसा केंद्रामधील सर्व यंत्रणा / मोजणी करणेसाठी व Staff जलसंपदा विभागामार्फत १ जानेवारी २०२५ पुर्वी ताब्यात घेऊन पाणी सोडण्याचे पूर्ण नियंत्रण ताब्यात ठेवण्याबाबत निर्देशित केलेले आहे.  म.ज.नि.प्रा., मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली १७.०६.२०२५ रोजीच्या संपन्न झालेल्या बैठकीत उपसा केंद्रामधील सर्व यंत्रणा / मोजणी करणेसाठी व Staff जलसंपदा विभागामार्फत ताब्यात घेऊन पाणी सोडण्याचे पूर्ण नियंत्रण ताब्यात घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. तसेच मा. मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे यांनी सदर उपसा केंद्रामधील सर्व यंत्रणा ३० जून २०२५ पुर्वी ताब्यात घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

उपसा केंद्रामधील सर्व यंत्रणा / मोजणी करणेसाठी व Staff जलसंपदा विभागामार्फत १ जानेवारी २०२५ पुर्वी ताब्यात घेऊन पाणी सोडण्याचे पूर्ण नियंत्रण ताब्यात ठेवण्याबाबत यापूर्वी पाटबंधारे  विभागाचे  खडकवासला धरणाखालील पंप गृहाचे नियंत्रण पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करणेबाबत व पंप गृहातील बंद मीटर दुरुस्त करणेबाबत  अधीक्षक अभियंता. पाणीपुरवठा विभाग,  यांना कळविले आहे. याबाबत पुणे महानगरपालिका,  यांचेकडून कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाही. असे पत्रात म्हटले आहे.

तसेच हस्तांतरणाबाबत मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण. मुंबई यांनी दिलेल्या सुचनेनुसार मा. मुख्य अभियंता (जसं). जलसंपदा विभाग. पुणे व मा. मुख्य अभियंता (पाणी पुरवठा). पुणे महानगरपालिका, पुणे यांची २४.०६.२०२५ रोजी झालेली संयुक्त आढावा बैठकीमध्ये आपण प्रत्यक्ष आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांचेसोबत सविस्तर चर्चा करून कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासित केले होते. तरी आयुक्त, यांची त्वरीत मान्यता घेऊन सदर पंपगृह जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करावे. असे पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठा विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: