Pune PMC News | ईगल व सिंग सिक्युरिटी कंपनी  कडून दोन महिन्यापासून कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे पगार प्रलंबित | महापालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे ठिय्या आंदोलन

Homeadministrative

Pune PMC News | ईगल व सिंग सिक्युरिटी कंपनी  कडून दोन महिन्यापासून कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे पगार प्रलंबित | महापालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे ठिय्या आंदोलन

Ganesh Kumar Mule Jul 15, 2025 4:13 PM

Pune Potholes | पोलिसांची एनओसी असली तरी आवश्यकता असल्याशिवाय स्पीड ब्रेकर बसवू नये | पथ विभागाच्या मुख्य अभियंता यांचे आदेश |खड्ड्याबाबत पथ विभागाचे काय आहे नियोजन!
PMC Pune Property Tax 40% Discount PT 3 Application Form | ४०% सवलतीचा पीटी ३ अर्ज महापालिका वेबसाईट वर उपलब्ध 
Hemant Bagul | ‘टीडीआर’ च्या इत्यंभूत नोंदींसाठी ‘  डिजिटायझेशन’ ठोस पर्याय

Pune PMC News | ईगल व सिंग सिक्युरिटी कंपनी  कडून दोन महिन्यापासून कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे पगार प्रलंबित | महापालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे ठिय्या आंदोलन

 

PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे मनपा मधील कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे ईगल कंपनी व सिंग सिक्युरिटी कडून गेल्या दोन महिन्यापासून पगार प्रलंबित आहेत. या संदर्भामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे मनपा मध्ये या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त   यांनी आंदोलन कर्त्या कामगार प्रतिनिधींची बैठक घेतली व मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या संदर्भामध्ये लवकरच आपण पुणे मनपाच्या आयुक्त यांच्यासमोर बैठक घेऊन कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले. अशी माहिती राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी दिली.  (Pune Municipal Corporation – PMC)

त्यानंतर राष्ट्रीय मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते सुनील शिंदे व कंत्राटी कर्मचारी यांनी मुख्य कामगार अधिकारी  नितीन केंजळे यांच्या दालनात आंदोलन केले.

जोपर्यंत वेतन जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व कामगारांसह तुमच्याच दालनात बसू असा निर्धार सर्वांनी केला.
त्यामुळे कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी प्रशासकीय हालचाली करत ईगल एजन्सीच्या व्यवस्थापनाशी मे महिन्याचा वेतन तात्काळ जमा करायला सांगितले. त्यानंतर काहीच तासातच मे महिन्याचे वेतन तात्काळ सुरक्षारक्षकांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली.

जून महिन्याचे वेतन येत्या काही दिवसात खात्यात जमा होईल असं व्यवस्थापनाने सांगितलं आहे.

जर जून महिन्याचा वेतन जमा झाले नाही तर निदर्शने आंदोलन संघटनेद्वारे आयुक्तांच्या दालनात करणार असा इशारा कामगार नेते व अध्यक्ष सुनील शिंदे यांनी यावेळी दिला.

या ठिय्या आंदोलनात संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सरचिटणीस एस के पळसे, सुरक्षा प्रतिनिधी विजय पांडव, उज्वल साने, गुरुनाथ बिराजदार, अरविंद आगम, जानवी दिघे, सचिन घोरपडे, प्रकाश इंदोरीकर, दिपाली कांबळे उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: