Annasaheb Magar College | अण्णासाहेब मगर महाविद्यालयात गॅस सिलेंडर हाताळणी प्रशिक्षण कार्यक्रम
Pune News – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी व सूर्या गॅस कंपनी बालेवाडी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गॅस सिलेंडर हाताळणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सूर्या गॅस कंपनीचे व्यवस्थापक योगीराज ढेरे व सूर्या गॅस कंपनीचे सहायक व्यवस्थापक राजेंद्र इनामदार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. दत्तात्रय टिळेकर यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी घरगुती गॅस सिलेंडर हाताळताना अपघात होण्याची शक्यता असते अशी आपत्ती येऊ नये यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपत्ती आल्यानंतर होणाऱ्या नुकसानीपेक्षा अगोदरच काळजी घेतली तर होणारे नुकसान टाळता येते. असे सांगितले.
गॅस सिलेंडर सुरक्षितपणे कसे हाताळायचे, सिलेंडरचे रंग, सिलेंडर जोडायचे, गॅस लिक होणे, सर्वसाधारणपणे सिलेंडरमध्ये दोन कारणांमुळे स्फोट होतो. गॅस लिक झाल्याने शेगडीमधून सिलेंडरपर्यंत आग पोहोचते. दुसरं कारण म्हणजे सिलेंडरची एक्स्पायरी डेट झालेली असेल तर असा सिलेंडरसुद्धा स्फोटाचं कारण ठरू शकतो. अशा परिस्थितीत आग लागल्यास आग कशी विझवायची याबद्दल योगीराज ढेरे यांनी प्रशिक्षण दिले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. जयश्री अकोलकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती पवार यांनी केले तर आभार डॉ. अजिनाथ डोके यांनी मानले.

COMMENTS