Pune PMC News | सिंहगड रोड परिसरात फ्रंट व साईड मार्जिनमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई
PMC Illegal Construction Department – (The Karbhari News Service) – सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सिंहगड रोड येथील रस्ता पदपथ, इमारत फ्रंट व साईड मार्जिनमधील अनधिकृत कच्चे पक्के बांधकाम निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. बांधकाम विकास विभाग झोन क्र. ०३ व अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली. अशी माहिती उपायुक्त संदीप खलाटे यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
आज रोजी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सिंहगड रोड येथील वारंवार येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीमुळे व वाहतूक कोंडीमुळे अतिक्रमण निर्मूलन कारवाई बांधकाम विकास विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभाग यांचे मार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली.
कारवाई उप आयुक्त अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग संदीप खलाटे व उप आयुक्त परिमंडळ क्र.३ विजयकुमार थोरात यांचे नियंत्रणाखाली तसेच महापालिका सहाय्यक आयुक्त सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय प्रज्ञा पोतदार यांचे उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईस क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक संजय जाधव,अतिक्रमण निरीक्षक मेघा राऊत ,कनिष्ठ अभियंता खाडे व शिंदे ,तसेच सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक प्रशांत कोळेकर, विनोद दुधे , आकांक्षा खोडे ,अविष्कार दवणे, योगेश कोत्तावड, हनमंत काटकर उपस्थित होते तसेच ०२ पोलीस व १० महाराष्ट्र सुरक्षा बल व ३० बिगारी सेवक इ. स्टाफ हजर होता.
सदर कारवाई मध्ये २००० स्के.फूट कच्चे/पक्के बांधकाम मोकळे केले.तसेच हातगाडी-०३, काऊंटर- ०७ इतर- १२ , शेड / झोपड्या-०८ जवळपास ०३ ट्रक साहित्य जप्त केले सदरची कारवाई यापुढे देखील मोठ्या प्रमाणात चालूच राहणार आहे.

COMMENTS