PMC Kamgar Union | कामगार युनियन कडून चतुर्थ श्रेणी कामगारांना दाखवण्यात आला मराठी चित्रपट

Homeadministrative

PMC Kamgar Union | कामगार युनियन कडून चतुर्थ श्रेणी कामगारांना दाखवण्यात आला मराठी चित्रपट

Ganesh Kumar Mule May 28, 2025 9:32 PM

shivsena Pune | भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही | डॉ. नीलम गोऱ्हे
Salary System | महापालिका सेवकांच्या वेतन प्रणालीत होणार सुधारणा! | पे रोल, शिक्षण विभाग व सेवानिवृत्त सेवकांना एकत्रितपणे जोडणार
PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी जारी केले सर्क्युलर!

PMC Kamgar Union | कामगार युनियन कडून चतुर्थ श्रेणी कामगारांना दाखवण्यात आला मराठी चित्रपट

 

Pune Mahanagarpalika Kamgar Union – (The Karbhari News Service) – आता थांबायचं नाय हा चतुर्थ श्रेणी कामगारांना प्रोत्साहन देणारा मराठी चित्रपट पुणे महानगरपालिका कामगार युनियनने दिनांक 27 मे रोजी दाखवला.

या वेळी चित्रपटातील मुख्य कलाकार ओम बुटके, प्राजक्ता हनमघर, युनियनच्या जनरल सेक्रेटरी मुक्ता मनोहर, उप आयुक्त, संदीप कदम, दिग्दर्शक अतुल पेठे, अभिनेत्री पर्ण पेठे यांचे समवेत चित्रपट पाहण्यात आला. तसेच पुणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक देखील यावेळी उपस्थित होते.  सर्वांनी पहावा असा व सर्वाना दाखवावा असा सुंदर चित्रपट आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिका भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर , प्राजक्ता हनमघर यांचा अभिनय खूपच छान आहे. महापालिकेच्या जवळपास ३०० हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी हा चित्रपट पाहिला.

—–

चतुर्थ श्रेणी कामगारांना पुढे नेणारा आणि त्यांना प्रोत्साहन देणारा हा चित्रपट आहे. याने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्या ना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहवा.

  • नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी, पुणे मनपा.