Corona in Pune | वाढत्या कोरोनावर उपाययोजना करण्याची कॉंग्रेस ची मागणी 

HomeBreaking News

Corona in Pune | वाढत्या कोरोनावर उपाययोजना करण्याची कॉंग्रेस ची मागणी 

Ganesh Kumar Mule May 22, 2025 7:47 PM

PMC Health Department | आरोग्य विभागाकडील अधिकाऱ्यांच्या कामकाज व्यवस्थापनात बदल | आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला आयुक्तांची मंजूरी
MLA Siddharth Shirole | हॉस्पिटल्स चालविण्याबाबत महापालिकेने धोरण ठरवावे | विशेष वैद्यकीय तज्ज्ञ नेमावेत |आमदार सिद्धार्थ शिरोळे
Shivsena Pune (UBT) –  शहरात उदभवलेल्या साथीच्या आजारा बाबत उपाययोजना करा | शिवसेना ठाकरे गटाची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Corona in Pune | वाढत्या कोरोनावर उपाययोजना करण्याची कॉंग्रेस ची मागणी

 

PMC Health Officer – (The Karbhari News Service) – राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात देखील उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहर कॉंग्रेस चे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी आरोग्य प्रमुखांना पत्र लिहित विविध मागण्या केल्या आहेत. (Rushikesh Balgude Pune Congress)

बालगुडे यांच्या पत्रानुसार  भारतात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आकडेवारी दिसत आहे. महाराष्ट्र राज्य व अन्य राज्यांमध्ये पुन्हा कोरोना संसर्गजन्य आजार प्रसार सौम्य प्रमाणात आहे.  पुणे शहरात या आजारांवर खबरदारी म्हणून शहरातील सर्व रुग्णालय दवाखाने येणाऱ्या तपासणीमध्ये आढळून आलेल्या संशयित रुग्णांविषयी मनपा प्रशासनाला कळविण्याविषयी सूचना देण्यात याव्यात. पुणे महानगरपालिका सर्व क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे कक्ष स्थापित करून त्या ठिकाणी रुग्णांविषयी माहिती संकलित करून क्षेत्रीय कार्यालयानुसार उपाययोजना करण्यात यावेत. मनपा रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी राखीव कक्ष स्थापन करण्यात यावा. कोरोना जनजागृती बाबत फलक बसविणे जाहिरात करण्यात यावी. रुग्णांसाठी मोफत औषध उपचार करण्यात यावा.  अशा मागण्या बालगुडे यांनी केल्या आहेत.