Pune Bal Jatra | शुक्रवारी ‘पपेट शो’, ‘शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिकां’सह रंगणार बालजत्रा!

Homeadministrative

Pune Bal Jatra | शुक्रवारी ‘पपेट शो’, ‘शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिकां’सह रंगणार बालजत्रा!

Ganesh Kumar Mule May 22, 2025 6:36 PM

7th Pay Commission DA Hike | महागाई भत्त्याबाबत चांगली बातमी!  पुढच्या वेळी 4% वाढेल, जाणून घ्या कोणत्या फॉर्म्युल्यातून मिळणार पैसे?
Home loan closing | गृहकर्ज बंद करताना या खास गोष्टींची काळजी घ्या |  तुम्हाला नंतर काळजी करण्याची गरज नाही | जाणून घ्या तपशील
Pune News | पर्वती परिसरातील अनधिकृत थडगा प्रकरणाची चौकशी करण्याची धीरज घाटे यांची मागणी

Pune Bal Jatra | शुक्रवारी ‘पपेट शो’, ‘शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिकां’सह रंगणार बालजत्रा!

Bal Jatra Pune – (The Karbhari News Service) – पुण्यात सुरु असलेल्या बालजत्रेत शुक्रवारी ‘हा खेळ सावल्यांचा’ (पपेट शो), ‘अभिजात मराठी भाषिक खेळ’, ‘गोष्टींची डायरी’, ‘शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिके’ आणि ‘लेखक तुमच्या भेटीला’ अशा विविध कल्पक आणि शिक्षणात्मक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे. (Pune News)

राष्ट्रीय पुस्तक न्यास (National Book Trust), पुणे पुस्तक महोत्सव (Pune Book Festival), पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation – PMC) आणि संवाद पुणे (Sanvad Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही बालजत्रा २५ मेपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य आहे. या जत्रेत मुलांसाठी विविध क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल आहे. बालसाहित्य, गोष्टी, विज्ञान व जादूचे प्रयोग, कथाकथन कार्यशाळा, पपेट शो, लेखकांशी गप्पा, पारंपरिक खेळ यांचा समावेश असून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांनी हा उत्सव रंगतो आहे.

शुक्रवारचे सकाळी ११ वाजता ‘हा खेळ सावल्यांचा’ हा पपेट शो चैताली माजगावकर भंडारी यांच्याकडून सादर केला जाणार आहे. दुपारी २ वाजता ‘अभिजात मराठी भाषिक खेळ’ हा उपक्रम ‘शिक्षण विवेक’चे ताई-दादा सादर करतील. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता ‘गोष्टींची डायरी’ या कार्यक्रमात पुणे मराठी ग्रंथालयाच्या बालविभागातर्फे मुलांनी लिहिलेल्या गोष्टी सादर केल्या जातील. सायंकाळी ४.३० वाजता केवळ ८ वर्षांचा अथांग सागर मुजुमले पाटील ‘शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिके’ सादर करणार आहे. सायं. ५.३० वाजता ‘लेखक तुमच्या भेटीला’ या सत्रात डॉ. संगीता बर्वे, ल. म. कडू, आबा महाजन आणि एकनाथ आव्हाड हे लेखक मुलांशी संवाद साधणार आहेत.

बालजत्रेच्या निमित्ताने मुलांना केवळ मनोरंजन नव्हे, तर ज्ञान, कलासंवेदनशीलता व संस्कृतीचे मोल जाणून घेता येणार आहे. पालकांनी आपल्या मुलांना या बहुरंगी अनुभवासाठी जरूर घेऊन यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: