PMC Veterinary Doctor | महापालिकेच्या मुख्य पशु वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल | नामनिर्देशन केले रद्द

Homeadministrative

PMC Veterinary Doctor | महापालिकेच्या मुख्य पशु वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल | नामनिर्देशन केले रद्द

Ganesh Kumar Mule May 22, 2025 9:31 AM

Ankush Kakde Vs Chandrakant Patil | दुसरे एखादे स्मारक करण्यापूर्वी ग दि.मा. स्मारक पूर्ण करा – अंकुश काकडे
Mahavikas Aghadi | Sinet Election | विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणार | अजित पवार
Departmental Examination | PMC Pune | विभागीय परीक्षेसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर!   | तिन्ही पेपर  लेखी घेण्याबाबत आग्रह 

PMC Veterinary Doctor | महापालिकेच्या मुख्य पशु वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल | नामनिर्देशन केले रद्द

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) या पदाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात आली आहे. हे पद १००% पदोन्नतीने भरले जाणार आहे. या पदाचे नामनिर्देशन रद्द करण्यात आले आहे. पदोन्नती ने पद नाही भरल्यास प्रतिनियुक्तीने हे पद भरले जाणार आहे. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मुख्य सभेची मान्यता घेऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाईल. (Pune Municipal Corporation Health Department)

आरोग्य विभागाकडील मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी व पशुशल्य चिकित्सक वर्ग १ या पदाच्या नियमात सुधारणा करण्यासाठी आरोग्य विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. यात डॉ सारिका फुंडे यांच्या अर्जाचा समावेश होता. हा प्रस्ताव आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला होता. आयुक्तांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार या पदाची नामनिर्देशनची पद्धत वगळून १००% पदोन्नती ने हे पद भरण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय पदोन्नती ने पद उपलब्ध न झाल्यास प्रति नियुक्तीने पद भरण्याचा देखील निर्णय घेण्यात आला.

– प्रचलित पद्धत काय होती?

– नामनिर्देशन :
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकीय शाखेतील पदवी.
– पशु वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि अथवा संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव असल्यास त्याला प्राधान्य.

– पदोन्नती : नामनिर्देशन साठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या पुणे महापालिका आस्थापने वरील सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारावर कार्यरत पशु वैद्यकीय अधिकारी म्हणून ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

– प्रतिनियुक्ती : नामनिर्देशन साठी विहित केलेली अर्हता आणि अनुभव धारण करणाऱ्या शासनाकडील समकक्ष योग्य त्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात येईल.

प्रस्तावित तरतूद काय आहे?

– पदोन्नती : १००%

– शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर पदवी (MVSC)

– अनुभव : वरील प्रमाणे विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या पुणे महापालिका आस्थापने वरील सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारावर कार्यरत पशुशल्य चिकित्सक वर्ग १ पदवरील ३ वर्षाचा अनुभव आवश्यक अथवा पशू वैद्यकीय अधिकारी (वर्ग २) या पदावर किमान ६ वर्षे अनुभव आवश्यक.

– प्रतिनियुक्ती :

पदोन्नती ने या पदावर अधिकारी उपलब्ध न झाल्यास नमूद शैक्षणिक अर्हता आणि शासन कडील समकक्ष पदावरील अनुभव धारण करणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात येईल.
—-