PMC Employees Transfer | एकाच खात्यात ३ वर्ष पूर्ण झाले असल्यास बदली करण्याची मागणी | प्रशांत जगताप यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली मागणी 

Homeadministrative

PMC Employees Transfer | एकाच खात्यात ३ वर्ष पूर्ण झाले असल्यास बदली करण्याची मागणी | प्रशांत जगताप यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली मागणी 

Ganesh Kumar Mule May 21, 2025 7:42 PM

NCP Youth Congress | महाराष्ट्र सरकार चालवणारेच जर गुजरातची चाकरी करत असतील तर युवकांनी दाद मागायची कोणाकडे..? | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अभिनव आंदोलन
PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी पदी  पदोन्नती
12 MLAs appointed to Legislative Council | राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

PMC Employees Transfer | एकाच खात्यात ३ वर्ष पूर्ण झाले असल्यास बदली करण्याची मागणी | प्रशांत जगताप यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली मागणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील  प्रशासन अधिकारी, अधीक्षक, उप अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक एकाच खात्यात ३ वर्ष पूर्ण झाले असल्यास बदली करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

याबाबत जगताप यांनी महापालिका आयुक्त यांना पत्र दिले आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेमार्फत दरवर्षी प्रशासकीय संवर्गातील प्रशासन अधिकारी, अधीक्षक, उप अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक यांच्या बदल्या राज्य शासन आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका) दर ३ वर्षांनी एकाच खात्यात काम करीत असल्यास बदल्या करीत असतात.

परंतु, कोरोना महामारी दरम्यानच्या कालावधीत प्रशासकीय बदल्या करणे शक्य झाले नाही. सबब विषयांकित अधिकारी यांच्या सलग ८ वर्ष एका खात्यात काम करूनही बदल्या झाल्या नाहीत. तदनंतर सन २०२३ व २०२४ मध्ये २०% सेवकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आमचे असे निदर्शनास आले आहे कि, सन २०२३ व सन २०२४ मधील ज्या सेवकांच्या इतर खात्यात बदल्या झालेल्या आहेत ते सेवक अद्यापही पूर्वीच्या खात्यात कामकाज करीत असून बदली झालेल्या खात्यातून वेतन घेत आहेत. अशा सेवकांना त्यांच्या बदली खात्यात तातडीने पाठविण्यात यावेत. तरी, प्रशासकीय संवर्गातील प्रशासन अधिकारी, अधीक्षक, उप अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक पदांच्या एकाच खात्यात तीन वर्षे पूर्ण झालेल्या सेवकांच्या बदल्या तातडीने करण्यात याव्यात. अशी मागणी जगताप यांनी केली आहे.