Pune News | पोर्शे कार प्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मृतांना आदरांजली

HomeBreaking News

Pune News | पोर्शे कार प्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मृतांना आदरांजली

Ganesh Kumar Mule May 19, 2025 6:30 PM

Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक
Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात  शिवसेना पुणे (UBT) चे आंदोलन 
NCP Agitation | बोट दाखवा, बोट थांबवा | भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरोधिक आंदोलन

Pune News | पोर्शे कार प्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मृतांना आदरांजली

| शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले स्मृती फलकाचे अनावरण

Porsche Car Accident Case – (The Karbhari News Service) – गील वर्षी पॉर्शे कार अपघाताच्या घटनेने पुणे शहर हादरले. एका धनिकाच्या पोराने अश्विनी कोष्टा व अनिश अवधिया या दोन निष्पाप नागरिकांना चिरडून माणुसकीची हत्या केली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी मिळून या धनिकाच्या मुलाला वाचवण्यासाठी केलेला आटापिटा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. (NCP-SCP Pune)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया सेलचे पुणे शहर उपाध्यक्ष डेरेक डिसिल्वा यांनी या घटनास्थळी स्मारकाचा फलक उभारून त्यांना अनोखी आदरांजली अर्पण केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण केले

या फलकाचे अनावरण करताना खरोखर मन गहिवरून आले अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. या स्मृती फलकाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघा नागरिकांना आदरांजली अर्पण केली.