International Nurse Day | आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा | पुणे महापालिकेतील परिचारिकांचा सत्कार!

Homeadministrative

International Nurse Day | आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा | पुणे महापालिकेतील परिचारिकांचा सत्कार!

Ganesh Kumar Mule May 12, 2025 4:34 PM

PMC 75th Anniversary | पुणे महापालिका सर्व माजी नगरसेवकांना आणणार एकत्र!
Pune News | पुणे (ग्रामीण) जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
 Aadhaar Card – Voter ID link | ‘मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य’ | तुम्हालाही आला आहे का हा मेसेज | जाणून घ्या काय करावे

International Nurse Day | आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा | पुणे महापालिकेतील परिचारिकांचा सत्कार!

 

PMC Health Department Employees – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील काम करणाऱ्या आरोग्य सेवा प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांचा सत्कार राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यालयात करण्यात आला. निमित्त होते आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे.

परिचारिकांचा कार्याचा गौरव करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम संघटनेतर्फे घेण्यात आला असे संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते सुनील शिंदे यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस हा साजरा केला जातो.

यावेळी पुणे महानगरपालिका, संजीवन हॉस्पिटल व इतर विविध खाजगी दवाखाण्यातील उपस्थित परिचारिकांनी कामाची ठिकाणी येणारे अनुभवबाबत मनोगत व्यक्त केली व संघटित झाल्यामुळे संघटनेच्या एकजुटीमुळे विविध प्रश्नाबाबत आलेल्या यशाबाबतची माहिती दिली. तसेच राष्ट्रीय मजदूर संघटनेच्या महिला आघाडीने नाटकही सादर केले.

कार्यक्रमाचा समारोप हा सामूहिक प्रतिज्ञाने झाला.
कार्यक्रमाची प्रास्ताविका एस. के. पळसे व सूत्रसंचालन मेघा वाघमारे यांनी केलं.