कोरेगाव-भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसर विकासासाठी एक कोटी
: स्थायी समितीची मंजुरी
पुणे : शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव-भीमा येथे उभारण्यात आलेल्या क्रांती स्तंभाच्या परिसरातील सुशोभिकरण आणि विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी एक कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता देण्यात आली आहे. याबाबत भाजपचे नगरसेवक राहुल भंडारे यांनी प्रस्ताव दिला होता. यातून आता तिथे मुलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती भंडारे यांनी दिली.
: राहुल भंडारे यांनी दिला होता प्रस्ताव
या बाबत भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य राहुल भंडारे यांनी समिती समोर प्रस्ताव सदर केला होता. त्यानुसार पुणे शहरालगत शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा येथे स्मारक उभारण्यात आलेले आहे. दरवर्षी देशभरातून दि. १ जानेवारीला लाखो भीम अनुयायी या क्रांती स्तंभास भेट देण्यासाठी येत असतात. त्याच बरोबर अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील मानवंदना देण्यासाठी येत असतात. दरवर्षी १ जानेवारीला मानवंदना देण्यासाठी मोठया प्रमाणावर भीम अनुयायी येत असतात; परंतू याठिकाणी असलेल्या सोईसुविधा अपुऱ्या असल्याने त्यांची गैरसोय होत असते. तरी कोरेगाव भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसराच्या सुशोभिकरण व विकासासाठी पुणे महानगरपालिकेकडून एक कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात यावेत. मंगळवारच्या समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली आणि याला मंजुरी देण्यात आली.
—
शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव-भीमा येथे उभारण्यात आलेल्या क्रांती स्तंभाला दरवर्षी १ जानेवारीला मानवंदना देण्यासाठी मोठया प्रमाणावर भीम अनुयायी येत असतात; परंतू याठिकाणी असलेल्या सोईसुविधा अपुऱ्या असल्याने त्यांची गैरसोय होत असते. मात्र आता निधी उपलब्ध झाल्याने ही गैरसोय दूर होणार आहे.
COMMENTS