Pune Municipal Corporation | एप्रिल  महिन्यात पुणे महापालिकेचे  54 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

Pune Municipal Corporation | एप्रिल  महिन्यात पुणे महापालिकेचे  54 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule May 03, 2025 6:38 PM

Financial provision | वित्तीय समितीने मंजूरी दिलेल्या आर्थिक तरतुदीचे आवश्यकता भासल्यास विभाजन | अतिरिक्त आयुक्तांची घ्यावी लागणार मंजूरी 
Pune Water Cut on Thursday | येत्या गुरूवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद 
Old Pension Scheme | CM Eknath Shinde | जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

Pune Municipal Corporation | एप्रिल  महिन्यात पुणे महापालिकेचे  54 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – एप्रिल २०२५   महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 54 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.अविनाश सांगोलेकर, आद्य मराठी गझल संशोधक, जेष्ठ गझलकार, सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपस्थित होते. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले.


सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्रीधर येवलेकर, अधीक्षक अभियंता यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांगोलेकर यांनी सेवानिवृत्त सेवकांना संबोधित करताना त्यांनी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून सेवानिवृत्त सेवकांचा सन्मान करण्याचा योग या ठिकाणी घडवून आणला आहे, आपण सेवानिवृत्त होत असला तरी तुमची दुसरी इनिंग सुरू होत आहे. आपण नेहमी आनंदाने कामे केली पाहिजेत, कामात व्यस्त राहिले पाहिजे असे सूचित केले. तसेच त्यांच्या दोन विनोदी गझला त्यांनी गाऊन दाखविल्या व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कदम यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: