Pune Water Cut | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Homeadministrative

Pune Water Cut | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Apr 22, 2025 6:07 PM

Mahabudget | ‘पंचामृत’ ध्येयाचा पहिला फटका होर्डिंग धारकांना! | बजेट ची जाहिरात करणे बंधनकारक
C. P. Radhakrishnan | सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ
Maharashtra Vidhansabha Election Voting | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान

Pune Water Cut | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – गुरुवार  रोजी जुनी धायरी येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून पाण्याची होणारी गळती थांबविणे व पारे कंपनी रोड येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करिणेकरिता यावर अवलंबून असणाऱ्या काही ठिकाणी पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी दिली आहे. (Pune Water cut on Thursday)

तसेच शुक्रवार रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेवून सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-

पारे कंपनी रोड, गणेश नगर, लिमये नगर, गारमळा, गोसावी वस्ती, बरांगणी मळा, दळवी वाडी, कांबळे वस्ती, मानस परिसर, नाईक आळी, यशवंत विहार बुस्टर वरील संपूर्ण परिसर, लेन नं. १० ते ३४ ए व बी दोन्ही बाजू, रायकर नगर, चव्हाण बाग, त्रिमूर्ती हॉस्पिटल परिसर इ.