PMC Additional Commissioner | नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून मागविण्यात आलेली माहिती तात्काळ सादर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (इ) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती 

Homeadministrative

PMC Additional Commissioner | नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून मागविण्यात आलेली माहिती तात्काळ सादर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (इ) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती 

Ganesh Kumar Mule Apr 12, 2025 8:55 PM

Shaskiy Adhikari Marathi Sahitya Sammelan | पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पुण्यात!| पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष !
Pune PMC News | नगरसचिव आणि क्रीडा अधिकारी पदावर नेमणुकी बाबतचे महापालिका आयुक्त यांचे आदेश जारी 
Increasing Voter Turnout | मतदानाचा टक्का वाढविण्याच्यादृष्टीने मतदान केंद्रावरील सुविधांबाबत व्यापक जनजागृती करा | जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

PMC Additional Commissioner | नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून मागविण्यात आलेली माहिती तात्काळ सादर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (इ) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – शासनाकडून तसेच नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून मागविण्यात आलेली माहिती तात्काळ सादर करण्याबाबत महानगरपालिका स्तरावर सर्व विभागाकडून माहिती संकलित करून सादर करणेकरिता अतिरिक्त आयुक्त दर्जाचे अधिकारी नेमण्याचे आदेश सरकार कडून देण्यात आले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांनी अतिरिक्त आयुक्त (इ) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांचा एकत्रित समन्वय साधण्याकरिता तसेच वेळोवेळी उद्भवणाऱ्या इतर कामाबाबत समन्वय साधण्यासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय कार्यालयात “महानगरपालिका समन्वय कक्ष १४” स्थापन करण्यात आला आहे. त्यानुषंगाने  संचालनालय स्तरावरून माहिती घेण्यात येते. यामध्ये    महानगरपालिकांचे / नगरपरिषदांचे सामायिक धोरण व उपस्थित होणाऱ्या समन्वयाच्या बाबी तसेच सेवाविषयक बाबींमध्ये मार्गदर्शन देणे, सर्वोच्च न्यायालय व  उच्च न्यायालय यांच्या संबंधीत उपस्थित होणाऱ्या बाबी, विधानमंडळ कामकाजाच्या दृष्टीने उपस्थित होणाऱ्या बाबी, अनेक महत्वाच्या बैठकाकरिता माहिती मागविणे, माहिती तयार करणे, कागदपत्रांची शहानिशा करणे याकरिता राज्यातील सर्व महानगरपालिकांना पत्र व्यवहार करणे, ई-मेल करणे, व्हॉट्सप द्वारे संदेश पाठविणे, सर्व महानगरपालिकांना वैयक्तिकरित्या दूरध्वनी द्वारे वारंवार संपर्क साधून माहिती मागविणे. अशा गोष्टींचा समावेश आहे.

यात  समन्वय साधण्यासाठी आपल्या महानगरपालिकेतील “अतिरिक्त आयुक्त” यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करणेबाबत सरकारच्या  सूचना प्राप्त आहेत.
त्यानुसार, नगरपरिषद प्रशासन संचालनालय कार्यालयात “महानगरपालिका समन्वय कक्ष १४” कडील उपरोक्त नमूद बाबींकरिता समन्वय साधण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडील अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इ) यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली  आहे.