Mahila Ayog Aapalya Dari | “महिला आयोग आपल्या दारी” तीन दिवस पुणे जिल्ह्यात महिलांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्या

Rupali Chakankar

HomeBreaking News

Mahila Ayog Aapalya Dari | “महिला आयोग आपल्या दारी” तीन दिवस पुणे जिल्ह्यात महिलांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्या

Ganesh Kumar Mule Apr 10, 2025 4:55 PM

Honeytrap DRDO Scientist | DRDO Scientist Arrested for Providing Confidential Information to Pakistan
PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई | आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार 
Water Closure | गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Mahila Ayog Aapalya Dari | “महिला आयोग आपल्या दारी” तीन दिवस पुणे जिल्ह्यात महिलांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्या

| रुपाली चाकणकर यांचे आवाहन

 

Pune News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी दि. १५ ते १७ एप्रिल, २०२५ या कालावधीत होणार आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर तीन दिवस पुणे जिल्हा दौरा करणार आहेत. यावेळी पुणे शहरातील तक्रारींची सुनावणी मंगळवार, १५ एप्रिल रोजी, तर पुणे ग्रामीणसाठी जनसुनावणी बुधवार, १६ एप्रिल रोजी होणार आहे. या दोन्ही जनसुनावण्या नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे सकाळी ११ वाजता होणार आहेत. तर गुरुवार, १७ एप्रिल रोजी दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे येथे सकाळी ११ वाजता पिंपरी-चिंचवडकरिता जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील होणा-या या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जनसुनावणीला जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबईत येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.’