PMPML Conductor Drivers | वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या चालक – वाहक सेवकांवर होणार कारवाई | पीएमपी प्रशासनाचा निर्णय 

Homeadministrative

PMPML Conductor Drivers | वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या चालक – वाहक सेवकांवर होणार कारवाई | पीएमपी प्रशासनाचा निर्णय 

Ganesh Kumar Mule Apr 08, 2025 11:21 AM

PMPML Pune | Need to get new buses in PMPL’s fleet! – Former MLA Mohan Joshi
PMPML CMD | दिपा मुधोळ – मुंडे यांनी स्वीकारला पीएमपीएमएल च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार
PMPML Bus | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात येणार ९०० बसेस 

PMPML Conductor Drivers | वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या चालक – वाहक सेवकांवर होणार कारवाई | पीएमपी प्रशासनाचा निर्णय

 

PMPML Pune – (The Karbhari News Service) – वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या चालक – वाहक सेवकांवर  कारवाई करण्याचा निर्णय  पीएमपी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. प्रवाशी नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांचेकडुन तक्रारी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.  (Pune PMP News)

परिवहन महामंडळाकडुन पुणे, पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या ग्रामीण भागात व पी.एम.आर.डी.ए.कार्यक्षेत्रा पर्यंत बससेवा पुरविली जात आहे. त्यामध्ये पी.एम.पी.एम.एल. व खाजगी ठेकेदाराच्या बसेसवरील चालक सेवक हे वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याबाबत सजग नागरिक मंच, पी.एम.पी.एम.एल. प्रवाशी मंच तसेच प्रवाशी नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांचेकडुन तक्रारी व सुचना प्राप्त होत असतात या तक्रारीमध्ये प्रामुख्याने मोबाईलवर बोलुन बसेस चालविणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे, रूट बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे इ. तक्रारीचा समावेश आहे.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार महामंडळाकडील चालक – वाहक सेवकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निराकरण होणाच्या द्दष्टीने महामंडळाने कार्यालय परिपत्रकाद्वारे चालक-वाहकांना सुचना दिल्या आहेत कि, बस संचलन करतांना मोबाईल फोनचा वापर करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन योग्यरित्या करणे, धुम्रपान करण्यात येऊ नये, बसेस बस स्टॉपवर लगत उभ्या करण्यात याव्यात, लेनच्या शिस्तीचे पालन करणे, भरधाव वेगाने बसेस संचलन करू नये अशा विविध प्रकारच्या सुचना दिलेल्या आहेत. तरी यापुढे वरील नियमांचे पालन न केल्यास  तक्रारीचे शहानिशा करून संबंधित चालक-वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे महामंडळाकडुन कर्मचाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत.