Pune PMC News | पुतळा उभारण्यासाठी पारीत केलेले ठराव, ना-हरकत प्रमाणपत्रे वर्षानुवर्षे राहताहेत पडून | पुन्हा नव्याने घ्यावी लागते परवानगी 

Homeadministrative

Pune PMC News | पुतळा उभारण्यासाठी पारीत केलेले ठराव, ना-हरकत प्रमाणपत्रे वर्षानुवर्षे राहताहेत पडून | पुन्हा नव्याने घ्यावी लागते परवानगी 

Ganesh Kumar Mule Apr 08, 2025 12:53 PM

MLA Sunil Tingre | सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय! | महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश
Pune Metro News | जनतेच्या पैशावर भाजपचा प्रचार | आयजी च्या जीवावर बायजी उदार | माजी आमदार मोहन जोशी
Salary paid to municipal employees | उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपा कर्मचाऱ्यांना दिले वेतन | कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण  | मात्र पहिल्या हफ्त्याची वाट अजून दूरच 

Pune PMC News | पुतळा उभारण्यासाठी पारीत केलेले ठराव, ना-हरकत प्रमाणपत्रे वर्षानुवर्षे राहताहेत पडून | पुन्हा नव्याने घ्यावी लागते परवानगी

 

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेने शहरात विविध ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी पारीत केलेले ठराव, ना-हरकत प्रमाणपत्रे वर्षानुवर्षे पडून राहताहेत. यामुळे पुन्हा पुतळा उभारण्यासाठी नव्याने परवानगी घ्यावी लागते. यात प्रशासनाचा देखील वेळ खर्ची पडत आहे. याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

पुणे महापालिकेच्या संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याबाबत २०१९ साली  मुख्य सभेने ठराव मान्य केला आहे. प्रशासकीय प्राप्त मान्येतेच्या अनुषंगाने उद्यान विभागाने पुतळा बसविणे कामी आवश्यक असलेल्या परवानगी प्राप्त होण्याकरीता पुढील कार्यवाही सुरु केली होती.  पुतळ्याचे चौथऱ्याचे काम पुणे महानगर पालिकेकडून करण्यात येत असून, अद्याप चौथऱ्या भोवतालचे सुशोभीकरणाचे काम सुरु आहे.

पुतळा बसविण्याकरीता  नगर विकास विभागाचे ना- हरकत पत्र मिळणेकरीता प्रस्ताव पाठविण्यात आला होता.  प्रस्तावास पत्रोत्तर प्राप्त झाले असून, त्यामध्ये अन्वयेच्या मार्गदर्शक सूचना नियमावलीनुसार “पुतळा उभारण्यासाठी पारीत केलेले ठराव, ना-हरकत प्रमाणपत्रे १ वर्षापेक्षा अधिक जुनी असू नयेत अशी तरतूद आहे.  प्रस्तावामधील महानगरपालिका सभा ठराव हा पाच वर्षापेक्षा जास्त जुना आहे. यास्तव प्रस्तावाच्या अनुषंगाने नव्याने ठराव पारीत करून ठरावाची प्रत तात्काळ शासनास उपलब्ध करून देण्यात यावी” असे कळविले आहे.

ठरावाचे अनुषंगाने नव्याने “छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १८ व्या वर्षी संस्कृत भाषेमध्ये बुधभूषण हा ग्रंथ रचला होता. त्यांच्या हया ग्रंथाची माहिती विश्वभर पोहचवण्यासाठी बुधभूषण ग्रंथ रचतानाचे छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प (शंभु शिल्प), गौरवशाली इतिहास जिवंत करण्यासाठी साधारणपणे ८ ते १० फुट उंच शंभू छत्रपती ग्रंथ रचताना बसलेले दर्शवलेले शिल्प उभे करण्यासाठी शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार शहर सुधारणा समितिच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

मात्र याला प्रशासनाची उदासीनता कारणीभूत मानली जात आहे. याआधी देखील पुण्याची पहिले महापौर बाबुराव सणस आणि महापालिकेचे पहिले आयुक्त स गो बर्वे यांचे अर्ध पुतळे बसवण्यासाठी ठराव मान्य झाला होता. ना हरकत प्रमाणपत्रे देखील प्राप्त झाली होती. मात्र वेळीच अंमलबजावणी न झाल्याने पुन्ह्या नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी देखील नव्याने मान्यता घ्यावी लागणार आहे. याकडे प्रशासन गंभीरपणे लक्ष देणार आहे का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: