Maharashtra Navnirman Sena Pune | मनसेचा आयसीआयसीआय बँकेला इशारा 

HomeUncategorized

Maharashtra Navnirman Sena Pune | मनसेचा आयसीआयसीआय बँकेला इशारा 

Ganesh Kumar Mule Apr 02, 2025 9:45 PM

Excavation in 3 days on asphalted road |  Vivek Velankar’s objection to the PMC road department
Pune Okayama Friendship | पुणे – ओकायामा मैत्रीची 20 वर्ष | कलाग्राम मध्ये कार्यक्रमाचे आयोजन
NCP Agitation | बोट दाखवा, बोट थांबवा | भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरोधिक आंदोलन

Maharashtra Navnirman Sena Pune | मनसेचा आयसीआयसीआय बँकेला इशारा

 

MNS Pune – (The Karbhari News Service) – महाराष्ट्रातील सर्व कारखाने/अस्थापने कार्यालये/बँका इत्यादी ठिकाणी होणारा दैनंदिन व्यवहार हा मराठी भाषेतूनच होणे अपेक्षित आहे. असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार पुणे मनसेने देखील काम करणे सुरु केले आहे. शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने आयसीआयसीआय बँकेला भेट देत व्यवहार मराठीतून करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा देखील दिला आहे. (ICICI Bank Pune Branch)

बाबर यांनी बँकेला दिलेल्या निवेदन नुसार राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशा नुसार महाराष्ट्रातील सर्व कारखाने/अस्थापने कार्यालये/बँका इत्यादी ठिकाणी होणारा दैनंदिन व्यवहार हा मराठी भाषेतूनच होणे अपेक्षित आहे. ग्राहकांशी/कर्मचारी वर्गाशी बोलताना मराठी भाषेचा वापर करणे,विविध अर्ज ,निवेदने , विविध माहिती फलक आदी साठी मराठी भाषेचा वापर होणे अपेक्षित आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्यानं प्रयत्न करीत आहे. याबाबत या अगोदर ही आपल्याला निवेदने दिली आहेत. आता तर या संदर्भात राज्य सरकारनी मराठी भाषेत व्यवहार करणे संदर्भात आदेश ही दिले आहेत. तसे नियमही केले आहेत इतकेच नाही तर मनसे च्या आग्रहानंतर मराठी भाषेचा जानकर व्यक्ती अधिकारी म्हणून प्रत्येक आस्थापनेत/कारखान्यात असावा या संदर्भातील आदेश ही या पूर्वीच दिले आहेत .

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, असे असताना काही ठिकाणी मराठी भाषेला जाणूनबुजून ठरवून नाकारण्याच काम काही नाठाळ करताना आढळून येत आहे. असे प्रकार या पुढे खपवून घेतले जाणार नाही याची नोंद घेत. अभिजात मराठी भाषेच्या वापरा संदर्भात योग्य त्या सूचना सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला देण्यात याव्यात तसेच सर्व प्रकारचे अर्ज /निवेदने ही मराठीतून उपलब्ध करून देण्याची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी.  या संदर्भात कुचराई झाल्यास आम्ही आपल्याला मनसे स्टाईल भेटू. असा इशारा देखील देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: