PMC Swimming Pool | पुणे महानगरपालिकेचे जलतरण तलाव झाले फुल्ल!   राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूना देखील तलावाचे आकर्षण 

Homeadministrative

PMC Swimming Pool | पुणे महानगरपालिकेचे जलतरण तलाव झाले फुल्ल!   राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूना देखील तलावाचे आकर्षण 

Ganesh Kumar Mule Apr 01, 2025 9:05 PM

Sovereign Gold Bond | सोन्यात गुंतवणूक करून मजबूत परतावा मिळवण्याची संधी | 22 ऑगस्टपासून सबस्क्रिप्शन ओपनिंग| 500 रुपयांची विशेष सूट
7th Pay Commission 5th Installment  | पुणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 7 व्या वेतन आयोगाच्या पाचव्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!
PMC Solid Waste Management Department | गणेश मूर्ती विसर्जनासाठी ३८ बांधलेले हौद,  २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्यांची सोय | २४१ मूर्ती संकलन केंद्रे  | ५५४ पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था 

PMC Swimming Pool | पुणे महानगरपालिकेचे जलतरण तलाव झाले फुल्ल!   राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूना देखील तलावाचे आकर्षण

 

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बाणेर येथील पुणे महानगरपालिकेच्या कै.धनंजय मधुकर ताम्हाणे जलतरण तलावावर पोहण्यासाठी तसेच पोहणे शिकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सुट्ट्यांमुळे लहान मुले पोहण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे जलतरण तलाव फुल होत आहेत. (Pune PMC News)

द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ तपन कुमार पाणिग्रही हे या ठिकाणी मुलांना दर्जेदार पद्धतीने होण्याचे प्रशिक्षण देत आहेत. अत्यल्प फी मध्ये दर्जेदार पद्धतीने महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये मुलांना प्रशिक्षण लाभत असल्यामुळे या ठिकाणी अनेक राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू सराव करण्यासाठी येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे त्यामुळे उन्हापासून सुटका मिळावी यासाठी जलतरण तलावावर पोहण्यास नागरिक गर्दी करू लागले आहेत लहान मुलांबरोबरच त्यांचे पालक देखील पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी जलतरण तलावांवर येत आहेत. बच्चे कंपनी या जलतरण तलावावर सकाळपासूनच गर्दी करत आहेत.

बाणेर परिसरातील इतर जलतरण तलावांच्या मानाने महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर माफक दरामध्ये नागरिकांसाठी कोचिंग तसेच पोहण्याच्या तलावाची सोय उपलब्ध केली असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोहण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र महिला प्रशिक्षकाचे देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाणेर परिसरातील खाजगी जलतरण तलावांवर पोहणे शिकण्यासाठी पाच ते सात हजार फी आकारले जाते त्यामुळे सामान्य नागरिकांना ही फी परवडत नाही परंतु महानगरपालिकेच्या जलतरण तलावांवर अत्यंत कमी फी मध्ये कोचिंग उपलब्ध करून दिल्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांना देखील या ठिकाणी पोहण्यासाठी दर्जेदार कोचिंग मिळत आहे.

बाणेर येथील महानगरपालिकेच्या ताम्हाणे जलतरण तलावामध्ये मिळणाऱ्या सुविधा दर्जेदार असल्यामुळे परिसरातील नागरिक पोहण्यासाठी या जलतरण तलावाला प्राधान्य देत आहेत. या ठिकाणी चेंजिंग रूम तसेच शॉवरची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच पोहण्यासाठी पोहण्याचा ड्रेस कंपल्सरी करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेने अत्यंत अल्प दरामध्ये बाणेर परिसरामध्ये पोहोण्याचा तलाव नागरिकांना उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत तसेच लहान मुलांबरोबरच पालक देखील या तलावामध्ये पोहण्याचा आनंद लुटत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: