Dr Vijay Kelkar | भारताचे महान अर्थतज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर २०२५ च्या पुण्यभूषण पुरस्काराचे मानकरी

HomeBreaking News

Dr Vijay Kelkar | भारताचे महान अर्थतज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर २०२५ च्या पुण्यभूषण पुरस्काराचे मानकरी

Ganesh Kumar Mule Mar 22, 2025 6:17 PM

Constitution Day of India | संविधान दिनानिमित्त प्रभागात 50 जणांना सायकल वाटप | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा उपक्रम
PMC property Tax Department | टॅक्स विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वशिलेबाजीने 
Election of representatives of Hawkers | पथारी व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची निवडणूक ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात! | महापालिकेने मागवल्या हरकती सूचना

Dr Vijay Kelkar | भारताचे महान अर्थतज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर २०२५ च्या पुण्यभूषण पुरस्काराचे मानकरी

 

Punyabhushan Purskar – (The Karabhari News Service) – ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर (Dr Vijay Kelkar) यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील (Economic Sector)  अतुलनीय योगदानाबद्दल २०२५ चा पुण्यभूषण पुरस्कार (Punyabhushan Award) डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr Raghunath Mashelkar)  यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरवण्यात येणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश‌ देसाई (Dr Satish Desai) यांनी जाहीर केले आहे. (Pune News)

पुरस्काराचे ३७ वे वर्ष आहे. सलग ३६ वर्षे संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि देशाबाहेरच्या ह्या प्रतिष्ठीच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला. अवघे मोगल साम्राज्य हादरवून टाकणाऱ्या बालशिवाजीची ,सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती ,या नगरीच्या ग्रामदैवतासह वैशिष्ट्यपूर्ण अशा पुण्यभूषण पुरस्काराच्या स्मृतीचिन्हात आहे. त्याचबरोबर रोख रकमेची थैलीही सन्मानित पुणेकरास दिली जाते.

महामहिम राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जी ,डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम ,उपराष्ट्रपती मा. श्री हमीद अन्सारी ,मा. श्री. व्यंकय्या नायडू ,माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी ,सभापती सोमनाथ चटर्जी ,श्री. मनोहर जोशी ,मा.ना. श्री शरद पवार ,स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ,क्रिकेटपटू कपिल देव व सचिन तेंडुलकर ,पांडुरंगशास्त्री आठवले ,विलासराव देशमुख ,ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार ,वसंतराव साठे ,नानासाहेब गोरे , तत्कालीन‌ राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम ,मधु दंडवते ,दि हिंदूचे संपादक एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी ,सुशिलकुमार शिंदे ,श्री. सिताराम येचुरी ,श्री. गिरीश कर्नाड , ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा श्री महेश एलकुंचवार ,मा. पृथ्वीराज चव्हाण , डॉ. विकास आमटे ,आशा भोसले ,श्री शरद यादव ,मा. श्री .नितीन गडकरी ,पं. हरीप्रसाद चौरसिया ,पं. अमजदअली खान व पं. शिवकुमार शर्मा ,मा. श्री प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मीला टागोर व ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर ,पद्मविभूषण नारायण मूर्ती आदी मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करुन नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे.