Mohan Joshi Pune | स्व.यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले | याच विचारांची सध्या महाराष्ट्राला गरज | माजी आमदार मोहन जोशी

Homecultural

Mohan Joshi Pune | स्व.यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले | याच विचारांची सध्या महाराष्ट्राला गरज | माजी आमदार मोहन जोशी

Ganesh Kumar Mule Mar 12, 2025 3:23 PM

Shivsena | Kothrud | एकनाथ शिंदेच्या फोटोला जोडे मारत कोथरूड मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन 
Shinde-Fadnavis Government | बेकायदेशीर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा | मोहन जोशी
Sushma Andhare | सुषमा अंधारे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र | वाचा पत्र जसेच्या तसे

Mohan Joshi Pune | स्व.यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले | याच विचारांची सध्या महाराष्ट्राला गरज | माजी आमदार मोहन जोशी

 

Yashwantrao Chavan – (The Karbhari News Service) – स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र समृद्ध करतानाच सुसंस्कृत राजकारण केले, त्याच विचाराने आणि मार्गाने जाण्याची सद्यस्थितीत गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (बुधवारी) स्व.चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलताना केले. (Pune News)

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सोशल मिडिया विभाग यांच्या वतीने स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त मंडईतील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी जलसिंचन, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा याची चांगली पायाभरणी महाराष्ट्रात केली आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी विविध समाजाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना एकत्र केले. काँग्रेस पक्ष मजबूत केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही पक्ष वाढीसाठी स्व.चव्हाण साहेबांच्या मार्गाने जाऊन मजबुतीने उभे राहिले पाहिजे. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची ती जबाबदारी आहे, असे आवाहन माजी आमदार मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना केले.

या प्रसंगी बाळासाहेब अमराळे, प्रविण करपे, भोला वांजळे, चेतन अगरवाल, गौरव बालंदे, धनंजय भिलारे, साहिल राऊत, गोविंद वांजळे आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियाचे सरचिटणीस सुरेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: