GBS In Pune | GBS या साथीच्या रोगाबाबत महानगरपालिके कडून पुणेकरांना देण्यात येणारी मदत न थांबवण्याची मागणी 

Homeadministrative

GBS In Pune | GBS या साथीच्या रोगाबाबत महानगरपालिके कडून पुणेकरांना देण्यात येणारी मदत न थांबवण्याची मागणी 

Ganesh Kumar Mule Feb 28, 2025 7:52 PM

Guillain Barre Syndrome In Pune | पुण्यात GBS  रुग्णांची संख्या ६७ वर ! | १३ रुग्ण वेंटीलेटर वर
GB Syndrome Pune PMC | GBS आजारासंदर्भात महत्वाचे निर्णय | जाणून घ्या काय घेतले निर्णय!
Health Minister on GBS | ‘जीबीएस’ बाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काय दिले आदेश! | एका संशयित रुग्णाचा मृत्यू

GBS In Pune | GBS या साथीच्या रोगाबाबत महानगरपालिके कडून पुणेकरांना देण्यात येणारी मदत न थांबवण्याची मागणी

| माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली मागणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – संपूर्ण राज्यभरात करोना नंतर नागरिकांच्या मनात धडकी भरवणाऱ्या “गुलियन बॅरो सिंड्रोम” अर्थात GBS या साथीच्या आजारासाठी पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation – PMC)  खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनुसार रुग्णांना मदत करण्याबाबत परिपत्रक काढले होते. महानगरपालिकेने काढलेल्या परिपत्रकात अनेक रुग्णांना दिलासा मिळाला होता. सध्या कमी रुग्ण आढळतात म्हणून ही मदत बंद करण्याचा प्रस्ताव आरोग्य खात्याने (PMC Health Department) दिला आहे. मात्र देण्यात येणारी मदत बंद करू नये, अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune News)

माजी नगसेवकांनी  आपल्या निवेदनात म्हटले आहे कि, या आजाराचा साथीचा समूळ नायनाट झाला आहे का ? (Eradication of pandemic), याबाबत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाशी तसेच केंद्र सरकारच्या महामारीच्या विभागाशी आपल्या खात्याने संपर्क करून त्यांच्याकडून खात्री करून घेतली आहे का ? आम्ही घेतलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या कुठल्याही सूचना अथवा आदेश आपण ना राज्य सरकारला विचारले ना राज्य सरकारकडून आपल्याकडे कळवले गेले तसं झालं असेल तर तसे सर्व कागदपत्र आपल्या संकेतस्थळावर टाकावेत. या आजाराच्या महामारीच्या किंवा साथीच्या रोगासाठी मूळ कारण हे अशुद्ध पाणीपुरवठा हे आहे.
दिवसेंदिवस शहर वाढत आहे. पुणेकरांना नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोताचा वापर करावा लागत आहे ही वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये ना नागरिकांची चूक आहे ना पुणे महानगरपालिकेची.  परिस्थितीचा विचार केला असता आतापर्यंत 35 रूग्णांना 49 लाख रुपये महानगरपालिकेने मदत केली. ही मदत महानगरपालिकेच्या दृष्टीने फार मोठी नाही. परंतु रुग्णाच्या दृष्टीने फार मोठी आहे.  हा निधी आपण सीएसआर CSR मधून आणखीन देखील मिळवू शकतो.

सर्व पार्श्वभूमीचा विचार करून पुणेकरांचा हित लक्षात घेता आणखीन किमान दोन महिने जीबीएस बाधितांना मदत थांबवण्याचा निर्णय न घेता रुग्णांना आणि यंत्रणेला दिलासा द्यावा. अशी मागणी माजी नगरसेवकांनी आयुक्त यांच्याकडे केली आहे.