Swarget Rape Case | स्वारगेट बस डेपो घटना : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन 

HomeBreaking News

Swarget Rape Case | स्वारगेट बस डेपो घटना : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन 

Ganesh Kumar Mule Feb 27, 2025 8:26 PM

Gold Silver Rate  |  दिवाळीपूर्वी सोने खरेदीची मोठी संधी | सहा महिन्यांत सोने झाले सर्वात स्वस्त
MLA Sunil Kamble | महारोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिराला तरूणांचा उस्फूर्त प्रतिसाद
Balbharati to Paud Fata road | बालभारती ते पौड फाटा रस्ता | महापालिकेला सल्लागाराने दिले तीन पर्याय

Swarget Rape Case | स्वारगेट बस डेपो घटना : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन

 

Pune Swarget Case – (The Karbhari News Service) – पुण्यातील या दुर्दैवी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी तथा मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज स्वारगेट चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. (NCP-SCP Pune)

पुणे शहरातील सर्वांत वर्दळीच्या, रहदारीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या स्वारगेट बस डेपो येथे एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक व निंदनीय आहे. लक्ष्मीचे, सरस्वतीचे रूप असलेल्या आपल्या भगिनीवर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात झालेला अत्याचार आपल्या सर्वांचीच मान शरमेने खाली घालणारा आहे. केवळ राजकारणात व्यस्त असलेले, आपल्या गुन्हेगार मंत्र्यांची कातडी वाचवण्यात व्यस्त असलेले सरकार, दिल्लीच्या पायाशी लोळण घालण्यात मग्न असलेले गृहमंत्री हेच पुण्याच्या या दयनीय अवस्थेला, आपल्या माता भगिनिंच्या दुर्दशेला जबाबदार आहेत. असे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.

 

या आंदोलनास प्रशांत जगताप,अश्विनीताई कदम, किशोर कांबळे, स्वातीताई पोकळे,मनाली भिलारे, मंजीरीताई घाड़गे,फईम शेख, गणेश नलावडे, नितिन कदम,श्रद्धा जाधव, निलेश वरे,रोहन पायगुडे, मंगलताई पवार,शशिकांत तापकीर तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: