Mahesh Patil PMC | उपायुक्त महेश पाटील यांना पुणे महापालिकेत पदोन्नती! | पदस्थापने वरून मात्र संभ्रम 

Homeadministrative

Mahesh Patil PMC | उपायुक्त महेश पाटील यांना पुणे महापालिकेत पदोन्नती! | पदस्थापने वरून मात्र संभ्रम 

Ganesh Kumar Mule Feb 25, 2025 9:32 PM

Deputy Commissioner Pratibha Patil has additional charge of PMC General Administration Department!
PMC Sport Competition | कामगार कल्याण निधी आयोजित क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्रभारी अतिरिक्त आयुक्त महेश पाटील यांच्या हस्ते 
Maratha Reservation Survey | PMC Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून!   | मानधन वितरण बाबत निवडणूक विभागाची उदासीनता 

Mahesh Patil PMC | उपायुक्त महेश पाटील यांना पुणे महापालिकेत पदोन्नती! | पदस्थापने वरून मात्र संभ्रम

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत प्रतिनियुक्ती वर उपायुक्त महेश पाटील यांना राज्य सरकारच्या महसूल विभागाने पुणे महापालिकेत पदोन्नती दिली आहे. त्यांची पदस्थापना करण्यात आली असून त्यांना अपर आयुक्त या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. मात्र पुणे महापालिकेत असे कुठलेही पद नसल्याने यावरून आता संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेत पदोन्नती देताना किंवा प्रतिनियुक्तीने नियुक्ती देताना नगरविकास विभाग किंवा सामान्य प्रशासन विभाग आदेश देतो. मात्र हा आदेश महसूल विभागाचा असल्याने संभ्रम अजून वाढला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

राज्य सरकार कडून अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकारी यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महेश पाटील यांना पदोन्नती देण्यात आली आहे. पाटील हे महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक विभाग, असे विविध विभाग आहेत. त्यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांना पुणे महापालिकेत पदस्थापना देण्यात आली आहे.

पाटील यांना पुणे महापालिकेत अपर आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे. मात्र महापालिकेत असे कुठलेही पद अस्तित्वात नाही, असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे.

महापालिकेत अतिरिक्त आयुक्तची २ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी सरकारला वेळ मिळत नाही. सरकारच्या या अनास्थेने शहराचे नुकसान होत आहे. त्यात अशा पद्धतीने पदे भरली जातात. राज्य सरकार मन येईल तसा कारभार करून महापालिकेच्या स्वायतत्ते वर गदा आणत आहे, अशी चर्चा आता महापालिका वर्तुळात आहे.

 —-
अपर आयुक्त नावाचे पद पुणे महापालिकेत अस्तित्वात नाही. या पदोन्नती बाबत महसूल विभागाचे आदेश आहेत. त्यामुळे याबाबत त्यांनाच माहिती असावी. शिवाय महापालिकेत पदोन्नती देताना किंवा प्रतिनियुक्तीने नियुक्ती देताना नगरविकास विभाग किंवा सामान्य प्रशासन विभाग आदेश देतो.

प्रतिभा पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.