Pune Municipal Corporation Budget | विधान भवनात तयार होणाऱ्या महापालिका बजेट बाबत महाविकास आघाडी ने घेतली आयुक्तांची भेट!

HomeBreaking News

Pune Municipal Corporation Budget | विधान भवनात तयार होणाऱ्या महापालिका बजेट बाबत महाविकास आघाडी ने घेतली आयुक्तांची भेट!

Ganesh Kumar Mule Feb 18, 2025 7:47 PM

Pune News | महिलांवरील अत्याचारांचे विरोधात महाविकास आघाडी आक्रमक |  सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन
Mahavikas Aghadi Nomination | महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर, सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांचे अर्ज दाखल
Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh | Mahavikas Aghadi Pune | क्रीडांगण आरक्षणा वरून महाविकास आघाडी उद्या करणार आंदोलन 

Pune Municipal Corporation Budget | विधान भवनात तयार होणाऱ्या महापालिका बजेट बाबत महाविकास आघाडी ने घेतली आयुक्तांची भेट!

 

PMC Budget 2025-26 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचे (Pune Municipal Corporation – PMC) आगामी बजेट हे पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेत (PMC) तयार होत नसून पुणे विधानभवनात (Vidhan Bhavan) होत आहे. ही बेकायदेशीर कृती आहे. हे आयुक्तांनी त्वरित थांबवावे अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi देण्यात आला आहे.

महाविकास आघाडी च्या निवेदन नुसार १४ मार्च २०२२ रोजी पुणे महानगरपालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मागील २ वर्ष अर्थसंकल्प सादर करीत आहेत. त्यानुसार यावर्षीही आयुक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नियमानुसार शहरातील विविध भागातील गरजेनुसार अत्यावश्यक बाबींची तरतूद होणे आवश्यक आहे. असे असताना मागील ४ दिवसांपूर्वी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी सदर बजेट त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या सूचनेनुसार त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व माजी नगरसेवकांच्या मागण्या मान्य करीत आगामी बजेट आपल्या प्रभावाचे असणार आहे, अशा प्रकारची वक्तव्य  केले. हे धक्कादायक आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे नियम व संकेत मोडणारे आहे. असे आमचे मत आहे. असे महाविकास आघाडी ने म्हटले आहे.

पुणे महानगरपालिकेचे आगामी बजेट हे पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेत तयार होत नसून पुणे विधानभवनात होत आहे. ही बेकायदेशीर कृती आहे, हे आयुक्तांनी त्वरित थांबवावे अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा महाविकास आघाडी च्या वतीने देण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेने नियमानुसार शहरातील, समाविष्ट गावातील,विविध भागातील आवश्यकतेनुसार व शहरातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अर्थसंकल्प केल्यास आमची काहीही हरकत नसेल पण भाजपाच्या प्रभावाखाली व मोठ मोठे बिल्डर्स यांच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प तयार झाल्यास उच्च न्यायालयात आम्ही दाद मागू. याबाबत महाविकास आघाडीच्यावतीने पुणे मनपा आयुक्त तथा प्रशासक   राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे.

याप्रसंगी श्री.प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री.संजय मोरे,श्री.गजानन थरकुडे, श्री. वसंत मोरे,श्री.सचिन दोडके, श्री.अशोक हरणावळ,श्री. किशोर कांबळे व महाविकास आघाडीचे आदी मान्यवर उपस्थित होते.