PMC Health Officer | पदोन्नतीने आरोग्य अधिकारी, उप आणि सहायक आरोग्य अधिकारी होण्याच्या महापालिका अधिकाऱ्यांच्या संधी वाढल्या | शैक्षणिक अर्हतेत दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी 

Homeadministrative

PMC Health Officer | पदोन्नतीने आरोग्य अधिकारी, उप आणि सहायक आरोग्य अधिकारी होण्याच्या महापालिका अधिकाऱ्यांच्या संधी वाढल्या | शैक्षणिक अर्हतेत दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी 

Ganesh Kumar Mule Jan 31, 2025 8:19 PM

Hotels in Khadakwasla | खडकवासला परिसरातील हॉटेलांची खैर नाही | कारवाई करण्याचे अजित पवारांचे आदेश
Prashant Jagtap Vs Jagdish Mulik | जगदीश मुळीकांची कर कपातीबाबत केलेली टीका म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारला घरचा आहेर | प्रशांत जगताप यांनी केली आलोचना
Beware Of Brokers | भरतीच्या नावाखाली पैसे घेण्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस! | महापालिकेकडून पुन्हा एकदा आवाहन

PMC Health Officer | पदोन्नतीने आरोग्य अधिकारी, उप आणि सहायक आरोग्य अधिकारी होण्याच्या महापालिका अधिकाऱ्यांच्या संधी वाढल्या | शैक्षणिक अर्हतेत दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी

PMC Health Department – (The Karbhari News Service) – महापालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना आरोग्य अधिकारी बनणे दुरापस्त होऊन बसले होते. त्यामुळे महापालिकेत राज्य सरकारचा अधिकारी प्रतिनियुक्तीने (Deputation) आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त केला जात होता. मात्र आता पदोन्नती ने आरोग्य अधिकारी (PMC Health Officer) बनण्याच्या महापालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या संधी वाढल्या आहेत. आरोग्य अधिकारी, उप आरोग्य आणि सहायक आरोग्य अधिकारी पदांच्या शैक्षणिक अर्हतेत दुरुस्ती करण्याच्या आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी या बाबत आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation Health Department)
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांचे सेवाप्रवेश  अधिसूचनेन्वये मंजूर करण्यात आलेले आहेत. तथापि, महानगरपालिकेतील आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ प्रशासकीय पदांवर सदर अर्हतेनुसार अधिकारी मिळत नसल्याने सदर पदे रिक्त राहू नये याकरीता मुख्य सभेने आरोग्य सेवेतील श्रेणी-१ मधील पदांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये दुरूस्ती करण्याबाबत प्रस्ताव १०. मार्च २०२२ रोजी  पारीत केला आहे.

त्यानुषंगाने आयुक्त यांनी  आरोग्य अधिकारी, उप आरोग्य अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी या पदांच्या शैक्षणिक अर्हतेत दुरूस्तीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यानुसार सदर पदांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये दुरूस्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

याबाबत शासनाने खालील निर्णय घेतला आहे.

आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी सादर केलेला  प्रस्ताव विचारात घेऊन पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील आरोग्य सेवेतील श्रेणी १ मधील आरोग्य अधिकारी, उप आरोग्य अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी या पदांच्या शैक्षणिक अर्हतेत खालीलप्रमाणे दुरूस्ती करण्यात आली आहे

१. आरोग्य अधिकारी (आरोग्य प्रमुख) आरोग्य सेवा, श्रेणी १ –

नामनिर्देशन (पदोन्नतीने उपलब्ध न झाल्यास)
विभागाने दुरूस्तीकरीता प्रस्तावित केलेली
नेमणूकीची अर्हता व नेमणूकीची पध्दती
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शाखेची पदवी (M.B.B.S).
ब) मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रतिबंधक आणि सामाजिक औषध शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (MD. (PSM)/M.D./M.S.) किंवा सार्वजनिक आरोग्य मधील पदव्युत्तर पदविका (DPH).
क) राज्य शासन / केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील सहाय्यक आरोग्य अधिकारी व तत्सम पदावरील किमान ७ वर्षांचा पर्यवेक्षीय व कार्यकारी पदाचा अनुभव असणे आवश्यक.
ड) रुग्णालयातील प्रशासन, सार्वजनिक आरोग्य व प्रतिबंधात्मक उपचारात्मक बाबी समर्थपणे हाताळण्याचा व विशेषतः स्वच्छता पर्यवेक्षण, साथ आजार निर्मुलन कार्यक्रम, हिवताप नियंत्रण आदी बाबींच्या कार्याचा किमान ०५ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य.
पदोन्नती – १००%
दुरुस्ती – नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणान्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उप आरोग्य प्रमुख संवर्गातील अधिकान्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
प्रतिनियुक्ती (पदोन्नती ने उपलब्ध न झाल्यास
दुरुस्ती – (नामनिर्देशन व पदोन्नतीसाठी योग्य अधिकारी उपलब्ध न झाल्यास) नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करणाऱ्या शासनाकडील योग्य अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने

२. उप आरोग्य अधिकारी – ( उप आरोग्य प्रमुख (कुटुंब कल्याण)). आरोग्य सेवा, श्रेणी १

नामनिर्देशन (पदोन्नतीने उपलब्ध न झाल्यास)
दुरुस्ती : 

अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शाखेची पदवी (M.B.B.S).
आ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रतिबंधक आणि सामाजिक औषध शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (MD. (PSM)/M.D./M.S.) किंवा सार्वजनिक आरोग्य मधील पदव्युत्तर पदविका (DPH).
ब) राज्य शासन / केंद्र शासन /स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील सहाय्यक आरोग्य अधिकारी व तत्सम पदावरील किमान ७ वर्षांचा पर्यवेक्षीय व कार्यकारी पदाचा अनुभव असणे आवश्यक.
क) रूग्णालयातील प्रशासन, सार्वजनिक आरोग्य व प्रतिबंधात्मक उपचारात्मक बाबी समर्थपणे हाताळण्याचा व विशेषतः स्वच्छता पर्यवेक्षण, साथ आजार निर्मुलन कार्यक्रम, हिवताप नियंत्रण आदी बाबींच्या कार्याचा किमान ०५ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य.
 
पदोन्नती -१००% 

दुरुस्ती – नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत सहाय्यक आरोग्य अधिकारी या संवर्गातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.


३ सहाय्यक आरोग्य अधिकारी/सहाय्यक आरोग्य प्रमुख (सहाय्यक परवाना प्रमुख) आरोग्य सेवा, श्रेणी -१

नामनिर्देशन दुरुस्ती : 


अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शाखेची पदवी (M.B.B.S).
(आ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रतिबंधक आणि सामाजिक औषध शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (MD. (PSM)/M.D./M.S.) किंवा सार्वजनिक आरोग्य मधील पदव्युत्तर पदविका (DPH).
अनुभव : सार्वजनिक आरोग्य विषयक कामाचा ५ वर्षांचा अनुभव.

पदोन्नती दुरुस्ती : मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी किंवा समकक्ष संवर्गाची किमान ५ वर्षाचा अनुभव.